WhatsApp List Feature in Chat : व्हॉट्सअॅपचे जगभरात दोन अब्जांहून अधिक यूजर्स आहेत. आपल्या यूजर्सना हे अॅप वापरण्याचा अधिकाधिक चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी सातत्याने नवनवीन फीचर्स लाँच करत असते. आता व्हॉट्सअॅपने चॅटिंगमध्ये चक्क एक्सेल शीटमध्ये असणारं फीचर दिलं आहे.
व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना तुम्हाला बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीला काही पॉइंटर्स किंवा यादी पाठवावी लागते. अशा वेळी तुम्हाला प्रत्येक पॉइंटच्या समोर आकडे लिहावे लागतात. मात्र, या नव्या फीचरमुळे तुमचा हा त्रास वाचणार आहे. (WhatsApp New Feature)
मेसेजमध्ये लिस्ट टाईप करताना तुम्हाला केवळ पहिल्या पॉइंटच्या समोर 1 हा अंक लिहावा लागणार आहे. त्यानंतर पुढे काही शब्द लिहून जेव्हा तुम्ही एंटर क्लिक कराल, तेव्हा खाली आपोआप 2 हा अंक लिहिलेला येईल. अशाच प्रकारे 3. 4. 5.. असे अंक खाली येत जातील.
विशेष म्हणजे, केवळ नंबरच नाही; तर पॉइंटर्ससाठी तुम्ही बुलेट्सचा वापरही करू शकता. एकूणच, एक्सेल शीटमध्ये ज्याप्रमाणे यादी तयार करता येते, तसंच आपल्याला व्हॉट्सअॅप चॅटमध्ये करता येईल.
WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. सध्या हे फीचर केवळ व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे फीचर मिळणार आहे. यासोबच टेक्स्ट अरेंज करण्यासाठी ब्लॉक्स, बुलेट लिस्ट, नंबर लिस्ट, कोट ब्लॉक असे फीचर मिळणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.