iPhone Display Time eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone Display Time : आयफोनच्या डिस्प्लेवर नेहमी 9:41 ही वेळच का दिसते? अगदी खास आहे कारण..

Steve Jobs : कित्येकांना वाटतं की हा अ‍ॅपल कंपनीचा लकी टाईम असेल, तर काहींना वाटतं ही स्टीव्ह जॉब्स संबंधित एखादी वेळ असेल.

Sudesh

Why does iPhone display 9:41 time : दरवर्षी अ‍ॅपल कंपनी आपल्या आयफोनचं नवीन मॉडेल लाँच करत असते. जगातील एक मोठा ब्रँड असणाऱ्या या फोनच्या कित्येक जाहिराती आपण पाहत असतो. तुम्ही जर आयफोनच्या जाहिराती किंवा पोस्टर्स नीट पाहिल्या असतील, तर एक गोष्ट तुम्ही नक्कीच नोटीस केली असेल. ती म्हणजे या आयफोनवर नेहमी 9:41 हीच वेळ दिसते. यामागे काय कारण आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

केवळ जाहिरातींंमध्येच नाही, तर ऑनलाईन स्टोअरवर किंवा पोस्टर्सवर देखील आयफोनच्या डिस्प्लेवर हीच वेळ दिसते. कित्येकांना वाटतं की हा अ‍ॅपल कंपनीचा लकी टाईम असेल, तर काहींना वाटतं ही स्टीव्ह जॉब्स संबंधित एखादी वेळ असेल. मात्र, हे सर्व अंदाज चुकीचे आहेत. अर्थात, फोनमध्ये ही वेळ दाखवण्याचा निर्णय स्टीव्ह जॉब्सचा (Steve Jobs) होता ही बाब तेवढी खरी आहे.

काय आहे कारण?

2007 साली जेव्हा पहिला आयफोन लाँच करण्यात आला होता, तेव्हा स्टीव्ह जॉब्स यांनी एका गोष्टीची खबरदारी घेण्यास सांगितलं होतं. ती म्हणजे आयफोन लाँच होतानाची वेळ मागे स्क्रीनवर दिसणाऱ्या फोनवर असायला हवी. अ‍ॅपलच्या टीमने इव्हेंट सुरू झाल्यापासून आयफोन लाँच होईपर्यंतच्या कार्यक्रमाची वेळ लक्षात घेत, यामध्ये 9:41 ही वेळ फिक्स केली.

मात्र अंदाज चुकला

मात्र, आयफोन लाँच करताना स्टीव्ह जॉब्स यांना थोडासा उशीर झाला. यामुळे नवा आयफोन 9:42 वाजता लाँच झाला. यामुळे स्क्रीनवर दिसणाऱ्या फोनमध्येही 9:42 ही वेळ दिसू लागली. पुढे तीन वर्षं हीच वेळ कायम ठेवण्यात आली.

2010 मध्ये बदलली वेळ

यानंतर 2010 सालापासून आधी ठरल्याप्रमाणे 9:41 ही वेळच आयफोनच्या जाहिरातींमध्ये दाखवणं सुरू करण्यात आलं. त्यानंतर आतापर्यंत हाच पायंडा पुढे नेला जात आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या iPhone 15 सीरीजमध्ये देखील हीच वेळ दाखवण्यात आली होती.

लाँच इव्हेंटची वेळ

अ‍ॅपलचा आयफोन लाँच इव्हेंट सोहळा हा दरवर्षी नऊ वाजेच्या सुमारास सुरू होतो. त्यानंतर इंट्रोडक्शन, नवीन प्रॉडक्टची आणि सॉफ्टवेअरची माहिती दिली जाते. असं करत करत आयफोन लाँच होण्याची वेळ ही साधारपणे 9:41 अशीच होते. ही परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न दरवर्षी अ‍ॅपल करत असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT