ट्रेनच्या मागील डब्यावर एक मोठं X चिन्ह असतं. हे चिन्ह तुमच्या कधी लक्षात आले आहे का?
रेल्वेचे नेटवर्क खूप मोठे आहे. रेल्वेबाबत (Railway) सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर होत असतात. पण, तुम्ही कधी ना कधी ट्रेनचा (Train) मागचा डबा पाहिला असेलच. ट्रेनच्या मागील डब्यावर एक मोठं X चिन्ह असतं. हे चिन्ह तुमच्या कधी लक्षात आले आहे का? या X चा अर्थ काय हे तुम्ही कधी समजून घेतले आहे का? तुम्ही शाळेत (School)असताना शाळेची प्रश्नपत्रिका नीट पाहिल्या असतील तर पानाच्या शेवटी जिथे प्रश्नपत्रिका संपते तिथे X चे चिन्ह असते. हे चिन्हाच्या शेवटी किंवा प्रश्नपत्रिकेच्या शेवटी तो प्रश्न शेवटचा आहे, असे सूचित केले जाते. त्याचप्रमाणे ट्रेनच्या शेवटच्या डब्यावरील X चे चिन्ह ट्रेनचा शेवटचा डबा असल्याचे म्हणजे तो डबा ट्रेनचा शेवटचा डबा असतो. पण यामुळे साहजिकच प्रश्न पडला असेल की ट्रेनकडे पाहूनच शेवटचा डबा कोणता ते लक्षात येतं. त्यासाठी X ची काय गरज आहे. (Why X Sign is Printed On The Last Coach Of Train)
X चा अर्थ नेमका काय?
कुठल्याही स्टेशनवरून जेव्हा ट्रेन जाते तेव्हा X असल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्याला ही ट्रेन सुरक्षित असल्याची खात्री पटते. तसेच ती पूर्ण पास झाली आहे, हेही कळते.यावरून रेल्वेचा एकही डबा मागे राहिला नसल्याची माहिती मिळते. जर हे X चिन्ह मागे दिसत नसेल, तर ट्रेनचा अपघात होऊन काही डबे मागे राहिल्याचे समजते. त्यानंतर लगेचच कारवाई सुरू केली जाते. त्यानंतर मागे राहिलेले डबे किंवा अपघात झाला असेल तर अपघातग्रस्त डब्यांचा शोध सुरू केला जातो आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था केली जाते.
शेवटच्या डब्यावर लाईट का असतो. LV का लिहितात?
दिवसा X हे चिन्ह पाहून अधिकारी ट्रेन सुरक्षिक आहे ते बघतात. रात्री मात्र X च्या अगदी खाली असलेला लाल दिवा लुकलुकत राहतो. जेव्हा कमी प्रकाश किंवा धुके असते, तेव्हा त्या लाईटवरून अधिकाऱ्याला ट्रेनचा शेवटचा डबाही ट्रेनमध्ये जोडला गेला आहे हे कळते. एक्स आणि लाईट व्यतिरिक्त, ट्रेनच्या मागील बाजूस पिवळ्या बोर्डवर LV लिहिलेले असते ज्याचा अर्थ शेवटचा डबा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.