Wikipedia Top 25 Searches in 2023 : विकिपीडियाला माहितीचा खजिना म्हटलं जातं. एखाद्या विषयाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल, तर इंटरनेटवर पहिल्यांदा विकिपीडिया या वेबसाईटवर तपासलं जातं. 2023 या वर्षामध्ये आतापर्यंत इंग्रजी विकिपीडिया पेजला तब्बल 84 बिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. विकिमीडिया फाउंडेशनने याबाबत माहिती दिली आहे.
या वर्षामध्ये सर्वात जास्त कोणत्या विषयांबाबत वाचलं गेलं, याची एक यादी विकिमीडियाने शेअर केली आहे. यात यावर्षीच्या टॉप 25 विषयांची नावं देण्यात आली आहे. सोबतच त्या विषयाला किती पेज व्ह्यू मिळाले हेही सांगण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, यात शाहरुख खानने कित्येक हॉलिवूड सेलिब्रिटीज आणि इलॉन मस्कलाही मागे टाकलं आहे. या यादीमध्ये आपल्या देशाचाही समावेश आहे. विकिपीडियावर तब्बल एक कोटींहून अधिक वेळा 'इंडिया' सर्च केलं गेलं. India या यादीमध्ये 21व्या क्रमांकावर होतं. तर United States या यादीत 18व्या क्रमांकावर राहिलं.
यावर्षी लोकांना सर्वात जास्त कुतूहल चॅटजीपीटीबाबत होतं. ChatGPT बाबत माहिती देणाऱ्या विकिपीडिया पेजला सुमारे पाच कोटी पेज व्ह्यूज मिळाले. ओपन एआय या कंपनीने लाँच केलेलं हे एआय टूल जगात भरपूर लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी सीईओ सॅम अल्टमन यांना काढल्यामुळे ओपन एआय कंपनी चर्चेत आली होती.
2023 वर्षामध्ये किती आणि कोणत्या व्यक्तींची प्राणज्योत मालवली याबाबत जाणून घेण्यातही लोकांना रस होता. Deaths in 2023 या पेजला 4 कोटी 26 लाख पेज व्ह्यू मिळाले.
यानंतर या यादीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे क्रिकेट वर्ल्डकप 2023 आणि इंडियन प्रीमियर लीग, म्हणजेच IPL होतं. या दोन्ही गोष्टींबाबत जाणून घेण्यात तीन कोटींहून अधिक यूजर्सना रस होता. केवळ 'क्रिकेट वर्ल्डकप' या पेजलाही सुमारे अडीच कोटी यूजर्सनी भेट दिली. हे या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर राहिलं. तर 2023 IPL असं स्पेसिफिक पेजही या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर राहिलं.
ओपनहायमर हा चित्रपट आणि जे. रॉबर्ट ओपनहायमर या दोन्ही गोष्टींबाबत जाणून घेण्यात लोकांना रस होता. यासोबतच शाहरुख खानच्या जवान आणि पठाण या दोन्ही चित्रपटांनी या यादीमध्ये अनुक्रमे आठवा आणि दहावा क्रमांक पटकावला आहे.
बार्बी हा चित्रपट या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर आहे. तर Avatar: The Way of Water हा चित्रपट 20व्या क्रमांकावर होता. मार्व्हलचा गार्डियन्स ऑफ दि गॅलक्सी हा चित्रपट या यादीमध्ये 23व्या क्रमांकावर राहिला.
जगप्रसिद्ध पॉप सिंगर टेलर स्विफ्ट या यादीमध्ये बाराव्या क्रमांकावर होती. त्यानंतर 14व्या क्रमांकावर प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो राहिला. त्याखालोखाल 15वा क्रमांक हा लियोनेल मेस्सीने पटकावला. फ्रेंड्स मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेला 'चँडलर', म्हणजेच अभिनेता मॅथ्यू पेरी याचं यावर्षी निधन झालं. विकिपीडिया सर्चमध्ये तो 17व्या क्रमांकावर होता.
ट्विटरचा मालक आणि टेस्ला, स्पेसएक्स अशा कंपन्यांचा संस्थापक इलॉन मस्क या यादीमध्ये 19व्या क्रमांकावर राहिला. अमेरिकन गायिका लिसा प्रेसली हिचंदेखील यावर्षी निधन झालं. या यादीत ती 22व्या क्रमांकावर राहिली. बिझनेसमन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अँड्रयू टेट या यादीत 25व्या क्रमांकावर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.