Smartphone Flash Saved Life eSakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Flash : मोबाईलच्या फ्लॅश लाईटमुळे समजला दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर; वेळीच उपचार केल्यामुळे वाचला बाळाचा जीव!

Rare Eye Cancer : थॉमस नावाच्या या मुलाच्या डोळ्यात काहीतरी पांढरं चमकत आहे असं साराला वाटलं. यानंतर तिने मोबाईलमधील फ्लॅशच्या मदतीने मुलाच्या डोळ्यांचं निरीक्षण केलं.

Sudesh

Rare Cancer Detected using Mobile Flashlight : कॅन्सरची लक्षणे ही सहजासहजी दिसत नाहीत. कित्येक जणांना उशीरा कॅन्सरचं निदान झाल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. इंग्लंडमधील एका महिलेने मात्र चक्क मोबाईल फ्लॅश लाईटच्या मदतीने आपल्या मुलाच्या डोळ्यातील कॅन्सर डिटेक्ट केला. वेळीच झालेल्या निदानामुळे या मुलावरील उपचार पूर्ण झाले आहेत.

इंग्लंडच्या गिलिंगहम केंट भागात राहणाऱ्या सारा हेजेस या महिलेची ही कहाणी आहे. 2022 साली किचनमध्ये काही काम करत असताना साराचं लक्ष आपल्या तीन महिन्यांच्या मुलाकडे गेलं. थॉमस नावाच्या या मुलाच्या डोळ्यात काहीतरी पांढरं चमकत आहे असं तिला वाटलं. यानंतर तिने मोबाईलमधील फ्लॅशच्या मदतीने मुलाच्या डोळ्यांचं निरीक्षण केलं, तसंच काही फोटोदेखील घेतले. (Mobile Flash saved life)

यानंतर साराने इंटरनेटवर सर्च करुन याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भरपूर शोध घेतल्यानंतर तिला समजलं की हा एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर (Rare Eye Cancer) आहे. याची खात्री करुन घेण्यासाठी ती थॉमसला घेऊन डॉक्टरांकडे गेली. यावेळी थॉमसला खरोखरच दुर्मिळ कर्करोग झाला असल्याचं स्पष्ट झालं. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

केमोथेरपी यशस्वी

डॉक्टरांनी लगेच थॉमसला मेडवे हॉस्पिटल या मोठ्या रुग्णालयात रेफर केलं. याठिकाणी थॉमसवर उपचार करण्यात आले. 2023 साली थॉमसची केमोथेरपी यशस्वीपणे पूर्ण झाली, आणि तो आता अगदी सुरक्षित आहे. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर डिटेक्ट झाल्यामुळे उपचार शक्य झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT