world radio day first radio station in in world nagpur news 
विज्ञान-तंत्र

World Radio Day : रेडिओच्या शोधाचा वाद अन् जगातील पहिले रेडिओ केंद्र माहितीये का?

भाग्यश्री राऊत

नागपूर : 'नमस्कार! हे आकाशवाणीचे दिल्ली केंद्र आहे. आपण ऐकत आहात...' अशी उद्घोषणा आपल्या कानावर पडते. पूर्वीच्या काळात सकाळी-सकाळी उठल्याबरोबर ही उद्घोषणा कानी पडायची अन् आपली एकच धावपळ उडायची. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई...उशीर झाला...अजून आवरायचं आहे, असे आवाज त्यावेळी आपल्या कानावर पडायचे. कारण त्या रेडिओ कार्यक्रमाच्या वेळेनुसार आपण आपली कामे ठरवत होतो. पण, ज्या रेडिओने आपल्याला गाण्यांचे वेड लावले, जगातील घडामोडीचे अपडेट्स दिले; त्याच रेडिओचे पहिले केंद्र कुठे होते, हे आपल्याला माहितीये का? आज १३ फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस. त्यानिमित्त आपण पहिले रेडिओ केंद्र कुठे होते? ते पाहुयात...

जागतिक रेडिओ दिवस का साजरा केला जातो? -
१३ फेब्रुवारी १९४६ मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती. यूनेस्कोच्या महासंचालकांनी रेडिओ दिवसाबाबत प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. जनतेमध्ये रेडिओसारख्या प्रभावी प्रसार माध्यमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओमार्फत माहितीचा साठा जनतेला प्रदान करणे, तसेच ब्रॉडकास्टर्स नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविणे, या सर्व गोष्टींसाठी रेडिओ दिवस साजरा करण्यात येतो.

रेडिओचा शोध एक वाद -
रेडिओचा इतिहास रोमांचक असला तरी रेडिओचा शोध कोणी लावला याबाबत वाद आहे. प्रथम रेडिओ उपकरण कोणी तयार केले हे आपल्याला ठाऊक नसले तरी 1893 मध्ये संशोधक निकोलाई टेस्ला यांनी सेंट लुईस येथे वायरलेस रेडिओचा शोध लावला याबाबत आपल्याला माहिती आहे. हे खरे असेल तरी गुग्लिल्मो मार्कोनी हे रेडिओचे जनक म्हणून ओळखले जातात. हे तेच मार्कोनी आहेत ज्यांनी १८९६ ला इंग्लंडमध्ये रेडिओच्या इतिहासामध्ये आपले स्थान मिळविणार्‍या पहिल्या वायरलेस टेलिग्राफी पेटंटचा पुरस्कार पटकाविला होता. त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर टेस्लाने त्याच्या मूलभूत रेडिओ पेटंटसाठी अमेरिकेत अर्ज दाखल केला. मार्कोनीला पेटंट मिळाल्यानंतर जवळपास चार वर्षांनी टेस्लाचा पेटंट अर्ज मंजूर करण्यात आला. अगदी पहिला रेडिओ कोणी तयार केला, याची पर्वा न करता, 12 डिसेंबर 1901 रोजी, अटलांटिक महासागर ओलांडून सिग्नल प्रसारित करणारा मार्कोनी पहिला व्यक्ती ठरला. त्यावेळी इतिहासामध्ये रेडिओचा जनक म्हणून मार्कोनीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

पहिले रेडिओ केंद्र -
नागरिकांनी 1920 च्या पहिल्या महायुद्धाच्या काळात वैयक्तीक वापरासाठी रेडिओ घेण्यास सुरुवात केली. युनायटेड स्टेट्स आणि यूरोपमध्ये केडीकेए (KDKA), पिट्सबर्ग, पेनसेलव्हेनिया आणि इग्लंडची  ब्रीटीश ब्रॉडकास्ट कंपनी उदयास आली. मात्र, १९२० मध्ये पहिल्यांदा वेस्टींगहाऊस कंपनीने व्यावसायिक परवान्यासाठी अर्ज केला. त्यामधून केडीकेए हे सरकारी मान्यता असलेले पहिले व्यावसायकि रेडीओ स्टेशन तयार झाले. वेस्टींगहाऊस याच कंपनीने पहिल्यांदा रेडीओवरूनच रेडीओ विक्रीची जाहिरात देखील जनतेला दिली होती. रेडीओ हा मुख्य प्रवाहात येत असतानाच घरगुती सिग्नल देखील मजबूत होऊ लागले. अशारितीने पिट्सबर्ग येथील केडीकेए हे रेडिओचे पहिले व्यावसायिक केंद्र बनले.

ब्रिटेनमध्ये १९२२ मध्ये ब्रिटीश ब्रॉडकॉस्ट कंपनीने रेडिओ प्रसारण सुरू केले होते. याच काळात १९२६ मध्ये संपूर्ण वृत्तपत्र मालकांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे रेडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि रेडिओ हा माहितीचा प्रमुख स्त्रोत बनला. त्याचबरोबर याच रेडिओवरून मनोरंजनाचे कार्यक्रम देखील प्रसारीत होऊ लागले. दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्व घडामोडींचे अपडेट्स देण्यासाठी रेडिओने महत्वाची भूमिका बजावली. हा एक विश्वासू स्त्रोत होता. त्यामुळे सरकारने देखील माहिती प्रसारीत करण्यासाठी रेडिओचाच वापर केला. दुसर्‍या महायुद्धानंतर ज्या पद्धतीने रेडिओचा उपयोग केला गेला होता त्यावरूनही जग बदलले. यापूर्वी रेडिओ ही मालिका कार्यक्रमांच्या रूपात मनोरंजनाचे स्रोत बनली होती, युद्धानंतर त्याने त्या काळातील संगीत वाजविण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

भारतात कधी आला रेडिओ? -
जून १९२३ मध्ये ब्रिटीश राजवटीत बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि अन्य रेडिओ क्लबच्या कार्यक्रमांनी रेडिओ प्रसारणास प्रारंभ झाला. त्यानंतर २३ जुलै १९२७ च्या करारानुसार ब्रिटीश ब्रॉडकॉस्ट कंपनीला मुंबई आणि कोलकाता हे दोन्ही रेडिओचे केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात आली.  १ मार्च १९३० ला ही कंपनी दिवाळखोरीमध्ये गेली. त्यानंतर सरकराने रेडिओचे प्रसारण ताब्यात घेतले. १ एप्रिल १९३० दोन वर्षांच्या प्रायोगिक तत्वावर भारतीय  राज्य प्रसारण सेवा (iSBS)ची सुरुवात झाली. त्यानंतर ८ जून १९३६ ला ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) मध्ये रुपांतर करण्यात आले. हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा दिल्ली, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, तिरुचिरापल्ली आणि लखनौ येथे भारतीय हद्दीतील सहा रेडिओ केंद्र होते. त्यानंतर पहिले एफ. एम ब्रॉडकॉस्टींग २३ जुलै १९७७ ला मद्रास येथे सुरू झाले.    
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT