X Accounts Ban eSakal
विज्ञान-तंत्र

X Accounts Ban : पाच लाखांहून अधिक भारतीय 'एक्स' अकाउंट्स बॅन; कंपनीची मोठी कारवाई

Sudesh

जगातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असणाऱ्या एक्स, म्हणजेच ट्विटरने एकाच महिन्यात पाच लाखांहून अधिक भारतीय अकाउंट्स बॅन केले आहेत. सप्टेंबर महिन्यात ही कारवाई करण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

भारतातील आयटी नियमांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला आपला यूजर सेफ्टी रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो. एक्सने यावेळी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत भारतातील 5,59,439 एक्स अकाउंट्स बॅन करण्यात आले आहेत. कंपनीच्या पॉलिसीचं उल्लंघन केल्यामुळे यातील बहुतांश अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत.

दीड हजार अकाउंट्स कायमचे बॅन

बॅन केलेल्या अकाउंट्सपैकी 1,675 एक्स खाती ही कायमची बंद करण्यात आली आहेत. दहशतवादाला चालना देणाऱ्या पोस्ट आणि मेसेज केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त चाईल्ड पॉर्नोग्राफी, न्यूडिटी अशा गोष्टी पोस्ट करणारी कित्येक खाती बॅन करण्यात आली आहेत.

तक्रारींवर कारवाई

या एका महिन्यात एक्स कंपनीला 3,076 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील अकाउंट बॅन विरोधातील 116 तक्रारींची पडताळणी करण्यात आली. यानंतर 10 अकाउंट्सवरील बॅन हटवण्यात आलं. यातील सर्वाधिक तक्रारी शोषण/गैरवर्तन केल्याबद्दल होत्या. चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि अडल्ट कंटेंट शेअर केल्याबद्दल देखील तक्रारी करण्यात आल्या होत्या.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात कंपनीने अशाच प्रकारे 12,80,107 अकाउंट्स बॅन केले होते. तर जून महिन्यात तब्बल 18,51,022 अकाउंट्स बॅन करण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT