Xiaomi 11i HyperCharge 
विज्ञान-तंत्र

फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज! नव्या वर्षात येतोय Xiaomi चा दमदार फोन

सकाळ डिजिटल टीम

Xiaomi 11i HyperCharge : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवस थांबा, कारण नवीन वर्षात अनेक नवीन स्मार्ट स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi नवीन वर्षात भारतात नवा मोबाईल लॉन्च करणार आहे. मिड-रेंज स्मार्टफोन Xiaomi 11i हायपरचार्ज पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार आहे.

Xiaomi चा दावा आहे की Xiaomi 11i हायपरचार्ज हा दमदार बॅटरी बॅकअपसह लॉन्च केला जाईल. या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग फीचर उपलब्ध असेल. या फोनमध्ये तुम्हाला दमदार बॅटरी मजबूत डिस्प्ले देण्यात येईस. या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले दिला जाईल आणि Android 11 आधारित MIUI 12.5 वर काम करेल.

15 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल

टेक तज्ञांचे म्हणणे आहे की Xiaomi 11i हायपरचार्ज स्मार्टफोन आधी लॉन्च केलेल्या Redmi Note 11 Pro + ची रीब्रँडेड आवृत्ती असेल. Xiaomi 11i हायपरचार्ज फोनमध्ये काही फ्लॅगशिप-ग्रेड फीचर्स देखील उपलब्ध असतील. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीला 120W फास्ट-चार्जिंग सपोर्ट असेल जो केवळ 15 मिनिटांत बॅटरी पूर्णपणे चार्ज करेल. असे म्हटले जात आहे की हा फोन भारतातील सर्वात फास्ट चार्जिंग असलेला 100W चार्जिंग स्पीड सपोर्ट स्मार्टफोन आहे.

Xiaomi 11i HyperCharge मध्ये दमदार 120Hz डिस्प्ले देण्यात येईल. डिव्हाइस 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह 6.67-इंच फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सेल) सुपर AMOLED स्क्रीन मिळेल. फोनमध्ये पंच-होल फ्रंट स्क्रीन, स्लिम बेझल्स आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 920 प्रोसेसरसह 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज क्षमता आहे.

कॅमेरा

Xiaomi 11i HyperCharge फोनच्या मागील बाजूस आयताकृती कॅमेरा युनिट असेल. मागील बाजूस एक ट्रिपल कॅमेरा सेट आहे, ज्यामध्ये 108MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP टेलीमॅक्रो सेन्सर देण्यात आले आहे. सेल्फीसाठी, फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत काय असेल

जरी कंपनीने अद्याप Xiaomi 11i हायपरचार्ज स्मार्टफोनच्या किंमतींचा खुलासा केलेला नाही. जाणकारांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर या फोनची किंमत 25 हजार रुपये असू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT