Xiaomi 13 Ultra  esakal
विज्ञान-तंत्र

Xiaomi 13 Ultra : पॉवरफुल चिपसेट आणि 50MP कॅमेऱ्यांसह लॉन्च झालाय Xiaomi 13 Ultra; फीचर्स आहेत एकदम दमदार

सकाळ डिजिटल टीम

Xiaomi 13 Ultra : Xiaomi च्या प्रीमियम फोनची वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आणखी एक नवीन हँडसेट बाजारात आला आहे जो यूजर्सना आवडेल. स्मार्टफोन निर्माता कंपनीने Xiaomi 13 Ultra स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

Xiaomi 13 Ultra ने अनेक खास फीचर्स आणले आहेत. यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, 2600 nits पीक ब्राइटनेससह 2K 12-बिट डिस्प्ले सारखी वैशिष्ट्ये मिळतील. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत येथे पाहू शकता.

Xiaomi 13 Ultra मध्ये लेदर फिनिशिंग आणि 90W फास्ट चार्जिंग सारखी अनेक टॉप-लेव्हल फीचर्स उपलब्ध असतील. सध्या हा फोन चीनसोबतच इतर काही देशांमध्येही लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने यामध्ये Leica चे 50MP कॅमेरे वापरले आहेत.

डिस्प्ले: Xiaomi 13 Ultra ला 6.73 इंच 2K AMOLED डिस्प्ले मिळेल, जो LTPO सपोर्टसह येतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 2600 nits पीक ब्राइटनेस, HDR10+, डॉल्बी व्हिजन यांसारखी फीचर्स मिळतील.

चिपसेट: नवीन हँडसेट Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटच्या सपोर्टसह लॉन्च करण्यात आला आहे. हा सर्वात शक्तिशाली चिपसेट मानला जातो.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी, यात 50MP क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. नवीन फोनमध्ये कंपनीने 50MP चे चार कॅमेरे दिले आहेत. त्याच वेळी, व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32MP मजबूत फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी 5,000mAH बॅटरी आहे. मात्र, तुम्हाला चार्जिंगचे टेन्शन येणार नाही, कारण यामध्ये 90W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानही उपलब्ध आहे.

स्टोरेज: कंपनीने हा फोन दोन स्टोरेज पर्यायांसह सादर केला आहे. Xiaomi 13 Ultra चे बेस मॉडेल 12GB + 256GB स्टोरेजसह येते तर दुसरे मॉडेल 16GB + 512GB स्टोरेजसह उपलब्ध असेल.

Xiaomi 13 अल्ट्रा: किंमत

Xiaomi चा नवीन स्मार्टफोन भारतात सुमारे 71,600 रुपयांना मिळेल. ही किंमत Xiaomi 13 Ultra च्या बेस मॉडेलची (12GB + 256GB स्टोरेज) आहे. दुसरीकडे, 16GB + 512GB मॉडेलसाठी अंदाजे रु 77,600 भरावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT