mi band 5 launch in china 
विज्ञान-तंत्र

MI Band 5 लाँच; 11 स्पोर्ट्स मोड असलेला बँड भारतात कधी?

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. 11 : शाओमीने बहुप्रतिक्षीत अशा Mi Band 5 चे लाँचिंग केले आहे. सर्वात कमी किंमत असलेल्या या फिटनेस बँडमध्ये अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. शाओमीने डिस्प्ले ते सेन्सर आणि प्रोसेसरमध्येही बदल केला आहे. याच्या NON NFC मॉडेलची किंमत 189 युआन म्हणजेच जवळपास 2 हजार रुपये आहे. NFC  मॉडेलची किंमत 229 युआन असून भारतीय चलनात 2500 रुपयांपर्यंत मिळते. चीनमध्ये याची विक्री 18 जूनपासून सुरू होणार आहे.

Mi Band 5 मध्ये 1.1 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. कलर डिस्प्ले असून त्याचं रिझोल्युशन 126x294 पिक्सल आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी 2.5 D टेम्पर्ड ग्लासही आहे. आधीच्या MI Band 4 च्या तुलनेत कमी जाडीचे बेजल्स आणि थोडा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. युजर्सना बँडचा इंटरफेसही बदलता येणार आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त नविन अॅनिमेटेड वॉच फेस दिले आहेत. 

शाओमीच्या नव्या बँडमध्ये 11 स्पोर्ट्स मोड दिले आहेत. आधीच्या बँडमध्ये फक्त 6 स्पोर्ट्स मोड मिळत होते. यामध्ये आऊटडोअर रनिंग, ट्रेडमिल, सायकलिंग, वॉकिंग, फ्री स्टाइल, पूल स्विमिंग, एलिप्टिकल, रोइंग मशीन, जंप रोप, इनडोअर सायकलिंग, योगा यांचा समावेश आहे. यामध्ये महिलांसाठी खास मेन्स्ट्रुएशन सायकल ट्रॅकिंग आणि PAI स्कोरिंग सिस्टिम देण्यात आले आहे. 

कंपनीने नवीन ट्रँकिंग फीचर्ससोबतच काही बदलही केले आहेत. MI BAND 5 मध्ये पहिल्या पेक्षा चांगले स्लीप ट्रँकिंग मिळणार आहे. तुम्ही झोपल्यानंतर हार्ट रेटिंगही ट्रॅक केलं जाईल. एवढंच नाही तर डेटा कलेक्ट केल्यानंतर बँडच सांगेल की चांगली झोप कशी घ्यायची. यामध्ये बिल्ट इन SpO2 (ब्लड ऑक्सीजन ट्रॅकर) दिला आङे. याच्या माध्यमातून सलग 8 तास प्रत्येक सेकंदाला तुमच्या ब्लड ऑक्सिजन लेव्हलला डिटेक्ट केलं जातं. हे फीचर MI Band 4 मध्ये दिलं नव्हतं. 

नव्या स्पोर्ट्स मोड आणि ट्रॅकिंग फीचर्सशिवाय यामध्ये मॅग्नेटिक चार्जिंग फीचरही देण्यात आलं आहे. बँडमध्ये 100 mAh बॅटरी दिली आहे. तसंच फुल चार्जिंग केल्यानंतर 14 दिवसापर्यंत वापरता येईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. चीनमध्ये या बँडला NFC आणि XiaoAI चा व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट मिळेल. सध्या तरी ग्लोबल व्हेरिअंटमध्ये हे मिळेल की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बँडचे स्ट्रॅप 6 रंगामध्ये उपलब्ध आहेत. चीनमध्ये 18 जूनपासून मिळणार असला तरी भारतात कधी उपलब्ध होईल हे कंपनीने सांगितलेले नाही.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: छत्रपती शिवाजी महाराजांची अन् रामदासांची भेट कुठे झाली? स्थळ, ठिकाण, वेळ कोणती?; अमित शहांना कुणी दिलं ओपन चॅलेंज

Indrajeet Sawant : “अमित शहांच्या विधानामागं व्यूहरचना"; शिवराय-रामदास स्वामींबाबतकेलेल्या विधानावर इंद्रजीत सावंतांची टीका

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत निवडणूक निरीक्षक कटारा यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

Dombivali Assembly Election : विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत स्टार प्रचारकांसाठी राजकीय पक्षांची धडपड; बाॅलिवूड, टाॅलीवूडशी संपर्क

SCROLL FOR NEXT