redmi 12 launch date specifications and price in india eSakal
विज्ञान-तंत्र

Redmi 12 : श्याओमीचं मोठं गिफ्ट! अवघ्या 8,999 रुपयांना लाँच केला 'रेडमी 12' स्मार्टफोन; 4 ऑगस्टपासून विक्री

Redmi Budget Smartphone : बजेट सेगमेंटमध्ये या स्मार्टफोनच्या माध्यमातून श्याओमीने मोठा धमाका केला आहे.

Sudesh

श्याओमीने आज भारतात Redmi 12 आणि Redmi 12 5G हे दोन नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केले. बजेट सेगमेंटमधील हे स्मार्टफोन अवघ्या 9 हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. 4 ऑगस्टपासून या मोबाईलची विक्री सुरू करण्यात येईल.

दोन व्हेरियंट

Redmi 12 हा फोन 4G असणार आहे. यामधील 4GB+128GB व्हेरियंटची किंमत 8,999 रुपये असणार आहे. तर, 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 10,499 रुपये असणार आहे. (Redmi 12 Price)

Redmi 12 च्या 5G व्हेरियंटमध्ये तीन पर्याय मिळतील. यातील 4GB+128GB व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 12,499 रुपये आहे. तर, 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आहे. या सुरुवातीच्या किंमती असून, यामध्ये बँक ऑफर्सदेखील पकडण्यात आल्या आहेत. (Redmi 12 5G Price)

कुठे असणार उपलब्ध?

Redmi 12 हा मोबाईल फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल, तर Redmi 12 5G हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त Mi.com या श्याओमीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि श्याओमीच्या रिटेल स्टोअर्समध्ये देखील हे दोन्ही स्मार्टफोन उपलब्ध असतील.

काय आहेत फीचर्स? (Redmi 12 Features)

रेडमी 12 5जी या स्मार्टफोनमध्ये 6.79 इंच मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 हा प्रोसेसर दिला आहे. तर यामध्ये अँड्रॉईड 13 आधारित MIUI 14 ही ओएल असणार आहे.

या फोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यातील प्रायमरी कॅमेरा 50 MP क्षमतेचा आहे. यातील बॅटरी 5000 mAh क्षमतेची असेल, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील व्हा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT