OnePlus Nord 2 5G 
विज्ञान-तंत्र

30 हजारांत मिळणारे टॉप स्मार्टफोन्स; पाहा काय आहेत किंमती-फिचर्स?

सकाळ डिजिटल टीम

भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोनचे ऑप्शन उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ही 30,000 रुपयांच्या खाली आहे. 2021 मध्ये, या किंमतीत Xiaomi, OnePlus, iQoo, Realme आणि इतरही अनेक कंपन्यांनी त्यांचे स्मार्टफोन लॉंच केले आहेत ज्यामध्ये एकापेक्षा एक वरचढ फीचर्स मिळतील. यापैकी बहुतेक स्मार्टफोन हे 5G कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतात. आज आपण अशाच 2021 मध्ये लॉंच झालेल्या काही टॉप स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत.

30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणते स्मार्टफोन बेस्ट आहेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आज आपण तीस हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार फोन्सची यादी पाहणार आहोत. मात्र या यादीमध्ये कोणताही विशिष्ट क्रम नाहीये. तसेच यापैकी काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत वर्षअखेरच्या सेलमध्ये कपात देखील झालेली असू शकते केली जाऊ शकते.

Samsung Galaxy M52 5G

या सेगमेंटमध्ये पहिला येतो तो Samsung Galaxy M52 5G, या स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 778 SoC, मिड-रेंज चिपसेट दिला आहे जो सहजपणे मल्टीटास्कींग करू शकतो आणि हेवी मोबाइल गेम्स आरामात चालवले जाऊ शकतात. तुम्हाला यामध्ये 6.67-इंच फुल-HD+ AMOLED स्क्रीन मिळते. सोबतच यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरे आणि मोठी 5,000mAh बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपयांपासून सुरू होते.

OnePlus Nord 2 5G

29,999 रुपये किंमत असलेल्या OnePlus Nord 2 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek SoC देण्यात आला आहे, कंपनीच्या लाइनअपमधील हा MediaTek SoC देणारा पहिला फोन असून यात पावरफूल MediaTek Dimensity 1200 AI चिपसेट आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरे दिले आहेत आणि वापरकर्त्यांना Warp Charge 65T फास्ट चार्जिंग ऑप्शन देखील मिळतो. हे 4500mAh ड्युअल-सेल बॅटरी युनिट 30 मिनिटांत चार्ज करू शकते.

Poco F3 GT 5G

सध्या देशात मोबाईल गेमिंगचे प्रमाण प्रचंड वाढत असून Poco F3 GT 5G विशेषतः अशाच वापरकर्त्यांसाठी डिझाइन केला आहे. यामध्ये MediaTek Dimensity 1200 SoC ने सपोर्टेड, हा गेमपॅड सारखा अनुभव देण्यारे मॅग्लेव्ह मेकॅनिकल ट्रिगर देखील देण्यात येतात. इतर फीचर्समध्ये 8GB पर्यंत RAM, 256GB स्टोरेज, 120Hz रिफ्रेश रेट आणि 480Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 64-मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 67W ते फास्ट चार्जिंगसह 5,065mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. भारतात त्याची किंमत 28,999 रुपयांपासून सुरू होते.

Moto Edge 20

Moto Edge 20 मध्ये देखील तुम्हाला दमदार फीचर्स पाहायला मिळतात, या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेशसह 6.7-इंच फुल-HD+ OLED डिस्प्ले, 8GB RAM, 4,000mAh बॅटरी आणि 108-मेगापिक्सेल कॅमेरा यासारखे फीचर्स आहेत. हे सर्व असूनही, बॅटरी परफॉर्मंस अव्हरेज आहे आणि कमी लाइटमध्ये फोटो घेताना अडचण येते, त्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहे. एकूणच, हा चांगला स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत भारतात 29,999 रुपये आहे.

Xiaomi Mi 11X 5G

हा 29,999 रुपये किंमतीत मिळणारा दर्जेदार स्मार्टफोन आहे, जो 6.67-इंचाच्या फुल-HD+ E4 AMOLED डिस्प्लेसह येतो. फोन 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1,300 nits पीक ब्राइटनेससह येतो. यामध्ये Qualcomm Snapdragon 870 SoC मिळतो जो OnePlus 9R ला देखील सपोर्ट देतो. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे आणि तुम्हाला स्मार्टफोनमध्ये 4,520mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह मिळते.

बाजारात 30,000 पेक्षा कमी किंमतीत अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यांचा समावेश या यादीत केला गेलेला नाही मात्र तुम्ही या सेगमेंटमधील Realme GT Master Edition, iQoo Z5 आणि OnePlus Nord CE 5G सारखे इतर फोन देखील पाहू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT