Bike Sakal
विज्ञान-तंत्र

Year Ender 2022: २०२२ मध्ये 'या' टॉप-५ बाईक्सने गाजवले मार्केट, जाणून घ्या काय आहे खास

2022 मध्ये Royal Enfield पासून ते Bajaj पर्यंत अनेक कंपन्यांनी शानदार बाईक्स लाँच केल्या आहेत. या वर्षात लाँच झालेल्या टॉप-५ बाईकविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Top-5 Motorcycles Launched In 2022: वर्ष २०२२ संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. यावर्षात अनेक शानदार बाईक्स लाँच झाल्या आहेत. कोरोनाच्या संकटानंतर आता लोकांनी पुन्हा वाहन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षात Royal Enfield पासून ते Bajaj पर्यंत अनेक कंपन्यांनी शानदार बाईक्स लाँच केल्या आहेत. वर्षातील टॉप-५ बाईकविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Royal Enfield Hunter 350

Royal Enfield Hunter 350

Royal Enfield ने यावर्षी Hunter 350 बाईकला भारतीय बाजारात लाँच केले आहे. ही कंपनीची बाजारात उपलब्ध सर्वात स्वस्त बाईकपैकी एक आहे. यामध्ये Classic 350 आणि Meteor 350 मध्ये मिळणारे इंजिन देण्यात आले आहे. ही १७ इंच व्हीलसह येणारी रॉयल एनफील्डची पहिली बाईक आहे. बाईकची सुरुवाती किंमत जवळपास दीड लाख रुपये आहे.

Bajaj Pulsar P150

Bajaj Auto यावर्षी P150 ला लाँच केले आहे. पल्सर पी१५० मध्ये एकदम नवीन पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. यात १५०सीसी इंजिन दिले असून, जे १४.३ बीएचपी पॉवर आणि १३.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याचे चेसिस पल्सर एन१६० सारखेच आहे. Bajaj Pulsar P150 ची किंमत जवळपास सव्वा लाख रुपयांपर्यंत आहे.

Ducati DesertX

Ducati DesertX

Ducati DesertX ही स्पोर्ट बाईक २०२२ मध्ये लाँच झाली आहे. ही केवळ एडव्हेंचर टूररच नाही तर ऑफ-रोडर बाईक आहे. यामध्ये ६ रायडिंग मोड्स, ४ पॉवर मोड्स, क्विकशिफ्टर, व्हीली कंट्रोल, क्रूज कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस आणि इंजिन ब्रेक कंट्रोल देण्यात आला आहे. बाईक ९३७ सीसी, लिक्विड-कूल्ड एल-ट्विन इंजिनसह येते. हे इंजिन ११० बीएचपी आणि ९२ एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकला खरेदी करण्यासाठी तुम्हाला १७ लाख रुपये खर्च करावे लागतील.

KTM RC 390

KTM RC 390 ला कंपनीने शानदार फीचर्ससह लाँच केले आहे. यामध्ये ब्लूटूथसह येणारी टीएफटी स्क्रीन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, एलईडी लाइटिंगसह बरचं काही मिळते. बाईक पॉवरफुल इंजिनसह येते. KTM च्या या बाईकची किंमत जवळपास ३ लाख रुपयांपर्यंत आहे.

Ultraviolette F77

Ultraviolette ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकला वर्ष २०२२ मध्ये लाँच केले आहे. ही बाईक सिंगल चार्जमध्ये ३०७ किमी अंतर सहज पार करते. यामध्ये १०.३ kWh बॅटरी पॅक दिला आहे. इलेक्ट्रिक मोटर ३८.८ बीएचपी आणि ९५ एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये ड्यूल-चॅनेल एबीएस, राइडिंग मोड्स, एडजस्टेबल लीव्हर, ५ इंच टीएफटी स्क्रीन, मोबाइल कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स मिळतील. बाईकची किंमत ३.८० लाख ते ५.५० लाख रुपयांपर्यंत आहे.

हेही वाचा: Hero Bike: हीरोने भारतात लाँच केली भन्नाट बाईक, पॉवरफुल इंजिनसह मिळेल बरचं काही; पाहा किंमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT