Gadgets Sakal
विज्ञान-तंत्र

Year Ender 2022: चर्चा तर होणारच! 'या' हटके गॅजेट्सने गाजवले २०२२ वर्ष; फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त

२०२२ मध्ये अनेक नवनवीन डिव्हाइस लाँच झाले आहेत. या वर्षात लाँच झालेल्या अशाच हटके डिव्हाइसबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

New gadgets 2022: वर्ष २०२२ अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिले आहे. टेक्नोलॉजी सेक्टरसाठी देखील हे वर्ष खास होते. या वर्षात अनेक नवनवीन डिव्हाइस लाँच झाले. २०२२ मध्ये लाँच झालेल्या अशाच हटके डिव्हाइसबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Nokia 5710 Xpress Audio

Nokia 5710 Xpress Audio

नोकियाने या इनबिल्ट वायरलेस इयरफोनसह येणाऱ्या फोनला सप्टेंबर महिन्यात लाँच केले होते. या फोनमध्ये २.४ इंच QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन यूनिसोक T107 प्रोसेसर, टी९ कीबोर्ड, ०.३ मेगापिक्सल कॅमेरा, ४८ एमबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजसह येतो. १४५० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या हटके फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे.

Jio Cattle tracker

जिओने इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये (IMC 2022) एका खास डिव्हाइसला सादर केले आहे. या डिव्हाइसमुळे गायांना ट्रॅक करणे शक्य आहे. डिव्हाइसचे नाव देखील कॅटल ट्रॅकर असे आहे. डिव्हाइसला गाईच्या गळ्यात अडकवले जाते, ज्यामुळे हेल्थ मॉनिटरिंग करणे शक्य होते. ट्रॅकिंग डिव्हाइसला jio गौ समृद्धि अ‍ॅपशी सहज कनेक्ट करता येईल. विशेष म्हणजे ४जी, ५जी नेटवर्कशी कनेक्ट करणे देखील शक्य आहे.

हेही वाचा: Google for India: डॉक्टरांचे हँडराइटिंग समजत नाही? गुगल आणणार अफलातून फीचर

Samsung Balance Mouse

Samsung Balance Mouse

सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच या हटके डिझाइनसह येणाऱ्या कॉम्प्युटर माउसला सादर केले आहे. या माउसमध्ये एक खास फीचर मिळते, ज्याद्वारे अतिरिक्त कामाची समस्या सहज दूर होईल. हा माउस ठराविक कालावधीनंतर यूजरला अतिरिक्त काम करण्यापासून रोखतो. म्हणजेच ओव्हरटाइम केल्यावर हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट होते. माउस हाताच्या हालचाली ट्रॅक करतो. अतिरिक्त कामानंतर पुन्हा माउसचा वापर केल्यास याचा मुख्य पार्ट आपोआप बाहेर येतो व डिव्हाइस काम करणे बंद करते.

Sony LinkBuds वायरलेस इयरफोन

सोनीने २०२२ मध्ये हटके डिझाइनसह येणारे Sony LinkBuds भारतात लाँच केले आहेत. हे इयरबड्स हटके डोनट डिझाइनसह येतात. याच्या हॉलो सेंटरवर एक रिंग डिझाइन देण्यात आले आहे. बड्स अ‍ॅडव्हान्स नॉइज कॅन्सिलेशन सपोर्टसह येतात. तसेच, ऑटोमॅटिक अ‍ॅडिप्टिव्ह साउंड कंट्रोल आणि इमर्सिव्ह साउंड सपोर्ट देखील मिळेल.

Nothing Phone 1

यावर्षात जर कोणत्या स्मार्टफोनची सर्वाधिक चर्चा झाली असेल तर ती म्हणजे Nothing Phone 1. जुलै महिन्यात लाँच झालेल्या या फोनमध्ये Glyph इंटरफेस देण्यात आला असून, जे LED स्ट्रिप्ससह येते. नथिंगचा हा फोन हटके फीचर्समुळे चर्चेत आला होता. डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८जी प्लस प्रोसेसर आणि ड्यूल रियर कॅमेरा दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल आहे. Nothing फोनची सुरुवाती किंमती ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT