Adhar Card sakal
विज्ञान-तंत्र

आधार कार्डवरील फोटो आवडत नाही? मग बदलून टाका ना! जाणून घ्या प्रक्रिया

तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलून घेऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

कोणत्याही महत्त्वाच्या व्यवहारांसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे आधारकार्ड हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. आधारकार्डशिवाय मुलाच्या शाळेत प्रवेशापासून ते नोकरी मिळण्यापर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आधार कार्डशिवाय जगणे अशक्य आहे. आधार कार्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि आधार क्रमांक यासंबधित संपूर्ण माहिती असते. तुमचा बायोमेट्रिक डेटा आधार कार्डवर देखील उपलब्ध असतो. (Adhar Card Update)

आधार क्रमांक जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) वेळोवेळी आधार कार्ड वापरणाऱ्या लोकांना मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती अपडेट करण्यास सांगत असते. पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलून घेऊ शकता.

अनेकांना त्यांच्या आधार कार्डमधील फोटो आवडत नाही. अशात एका प्रक्रियेद्वारे आधार कार्डमधील आपला फोटो तुम्ही सहज बदलू शकतो किंवा अपडेट करू शकतो. आधार कार्डमधील फोटो बदलण्याची कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नसल्यामुळे तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन हि प्रक्रिया पूर्ण करू शकता. (you can change your photo on adhar card follow these steps)

जाणून घ्या प्रक्रिया -

1. प्रथम तुम्हाला UIDAIची वेबसाइट uidai.gov.in या वर लॉग इन करावे लागेल आणि आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

2. हा आधार नोंदणी फॉर्म भरा आणि जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर सबमिट करा.

3. आधार नोंदणी केंद्रावर तेथील कर्मचारी तुमचा बायोमेट्रिक डिटेल्स घेईल.

4. आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचा फोटो घेईल.

आणि शुल्क घेऊन तुमच्या आधार कार्डमधील फोटो अपडेट करेल.

6. सोबतच तुम्हाला URN सोबत एक स्लिप देखील देईल.

7. तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही या URN चा वापर करू शकता.

8. आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर, नवीन फोटोसह अपडेट केलेले आधार कार्ड UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड तुम्ही करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT