Mobile App Sakal
विज्ञान-तंत्र

कोणत्या App मुळे होतोय मोबाईल हँग?; 'या' पद्धतीने करा चेक

तुमचाही फोन अचानकपणे स्लो होतो का?

शर्वरी जोशी

आजकाल प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन (smartphone) पाहायला मिळतो. त्यामुळे सध्याच्या काळातील ही तरुणाई सतत मोबाईलवर काही ना काही करतच असते. गाणी ऐकणं, गेम खेळणं, चित्रपट पाहाणं असे बरेच उद्योग त्यांचे सुरु असतात. मात्र, एका ठराविक वेळेनंतर हे स्मार्टफोन अचानक स्लो होऊ लागतात. बऱ्याचदा फोन हँगदेखील होतो. परंतु, मोबाईल हँग होण्यामागचं नेमकं कारण आपल्याला समजत नाही. परंतु, फोन हँग होण्यामागे आपल्याच फोनमधील काही अ‍ॅप जबाबदार आहेत. (you-can-check-which-apps-make-slow-your-mobile)

तुम्ही कोणतंही नवीन अ‍ॅप डाऊनलोड केलं की त्याला साधारणपणे फोनमधील ४०० ते ५०० एमबीपर्यंतची जागा लागते. त्यामुळे अशा जागा व्यापणाऱ्या असंख्य अ‍ॅपचा भरणा आपल्या फोनमध्ये झालेला असतो. परंतु, जागा व्यापणारे व हँग करणारे अ‍ॅप ओळखायचे कसे हा प्रश्न तुमच्या समोर उभा राहिला असेल. पण, हे अ‍ॅप ओळखणं अत्यंत सोपं आहे. त्यासाठी खालील प्रयोग नक्की करुन पाहा.

फोन स्लो करणाऱ्या App चा असा घ्या शोध

प्रथम मोबाईल सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर स्टोरेज किंवा मेमरी असा एक ऑप्शन दिसेल. त्यावर जा. स्टोरेज लिस्ट ओपन झाल्यावर कोणत्या App ला जास्त जागा लागते हे तुमच्या लक्षात येईल. या ऑप्शनमध्येच तुम्हाला इंटरनल मेमरीची माहिती मिळेल. त्या मेमरीवर क्लिक करा आणि Memory used by apps वर जा. येथे गेल्यावर तुम्हाला RAM च्या 4 इंटरवल्स फोनची किती मेमरी वापरली गेली याची माहिती मिळेल. यामध्येच कोणत्या App मुळे फोन जास्त स्लो होतोय हेदेखील समजेल. जर हे App तुम्ही जास्त वापरत नसाल तर ते डिलीट करा किंवा Cache क्लिअर करा.

दरम्यान, मोबाईल व्यवस्थित चालावा किंवा शक्यतो Lite व्हर्जन अ‍ॅपचा वापर करावा. तसंच अनावश्यक असलेले अ‍ॅप लगेच फोनमधून डिलीट करावेत. गरज नसेल तेव्हा अ‍ॅप बंद करुन ठेवावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT