YouTube Monetization policy change YouTube will allow anyone with 500 subscribers to earn money  
विज्ञान-तंत्र

YouTube : खुशखबर! आता युट्यूबवर पैसे कमवणे झाले सोपे; फक्त 500 सब्सक्राइबर्स असले तरी...

रोहित कणसे

तुम्ही युट्यूबवर फॉलोअर्स मिळवण्यासाठी धडपडणारे कंटेंट क्रिएटर आहात का? असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. युट्यूने जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी अवश्यक असलेली किमान सब्सक्राइबर्सची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता युट्यूबवर आवश्यक असलेल्या सब्सक्राइबर्सची संख्या 1000 वरून 500 पर्यंत कमी करण्यात आली आहे. YouTube कडून प्लॅटफॉर्मवर छोट्या क्रिएटर्सना अधिक संधी मिळावी यासाठी मॉनिटायजेशन संबंधी धोरणांमध्ये मोठे बदल करत आहे.

या पूर्वी व्हिडीओ क्रिएटर्सना युट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आणि त्यांच्या कंटेन्टवरून पैस कमवण्यासाठी काही ठराविक निकष पूर्ण करावे लागायचे. मात्र, आता कंपनीच्या नवीन धोरणांतर्गत, क्रिएटर्सना याकरिता पात्र होण्यासाठी केवळ 500 सब्सक्राइबर्स असणे आवश्यक आहे, जी संख्या आधीपेक्षा निम्मीच आहे.

आधी कुठे लागू होणार?

त्यासोबतच वॉच आवर्सचा निकष देखील 4,000 वरून 3,000 करण्यात आला आहे . इतकेच नाही तर शॉर्ट्स व्ह्यूजची आवश्यकता देखील 10 मीलियन वरून 3 मिलीयन इतकी कमी करण्यात आली आहे. मात्र हे युट्यूबच्या धोरणातील बदल सुरुवातीला युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये लागू करण्यात येणार आहे.

लहान क्रिएटर्सना आता युट्यूबवरील त्यांच्या व्हिडीओजच्या माध्यमातून पैसे कमावणे अधिक सोपे होणार आहे. तरीही त्यांना त्यांचे प्रेक्षक वाढवणे आणि जाहिरातीतून पैसे मिळविण्यासाठी विशिष्ट बेंचमार्क पूर्ण करणे आवश्यक आहे.

दरम्यान सध्याचे कमाईच्या वाटणीबद्दलचे नियम हे मात्र बदलणार नाहीत. तसेचजे क्रिएटर्स आधीच युट्यूब पार्टनर प्रोग्रमासाठी पात्रता गाठली आहे त्यांना पुन्हा यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

युट्यूब जाहिरातच्या माध्यमातून पैसे मिळवण्याकरिता क्रिएटर्सना प्रोत्साहित करत आहे. खासकरून युट्यूबवर दिसणाऱ्या शॉर्ट्ससाठी देखील जाहिरात देण्यात येतील. ज्यामुळे शॉर्ट व्हिडीओवर देखील क्रिएटर्सना पैसे कमवता येणार आहेत.

तसेच युट्यूब सध्या त्यांच्या Shopping Affiliate Program सेवांचा विस्तार करत आहे, जो पूर्वी केवळ निवडक क्रिएटर्सनाच उपलब्ध होता. अमेरिकेतील YPP सदस्य ज्यांचे 20,000 सबस्क्राइबर्स आहेत ते देखील याचा लाभ घेऊ शकतील.त्यांना या माध्यमातून पैसे कमवता येतील.

लहान क्रिएटर्सना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या कमाईच्या पर्यायांमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने YouTube सकारात्मक बदल करत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे क्रिएटर्सना युट्यूबच्या माध्यामातून उत्पन्न मिळवता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT