youtube premium price hike esakal
विज्ञान-तंत्र

Youtube Premium Price Hike : यूट्यूब वापरकर्त्यांसाठी टेंशन; प्रीमियम प्लॅन्सच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नव्या किंमती?

youtube premium subscription price hike : जाहिरात नसलेले व्हिडीओ पाहणे, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि हाय डेफिनिशन व्हिडीओ क्वालिटी यासारख्या फायद्यांमुळे यूट्यूब प्रीमियम खूप लोकप्रिय आहे. मात्र, आता यूट्यूब प्रीमियमच्या किमती वाढल्या आहेत.

Saisimran Ghashi

Youtube Premium Update : हल्लीच्या काळात एंटरटेंमेंटच्या अनेक पर्यायांमध्ये यूट्यूब सर्वात लोकप्रिय आहे. पण अनेकदा व्हिडीओ बघताना सारख्या येणाऱ्या जाहिराती नको वाटतात. या समस्येवर तोडगा आहे यूट्यूब प्रीमियम. जाहिरात नसलेले व्हिडीओ पाहणे, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि हाय डेफिनिशन व्हिडीओ क्वालिटी यासारख्या फायद्यांमुळे यूट्यूब प्रीमियम खूप लोकप्रिय आहे. मात्र, आता यूट्यूब प्रीमियमच्या किमती वाढल्या आहेत. चला तर मग या वाढीचा तुमच्या पॅकेजवर कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.

यूट्यूब प्रीमियमच्या किमती वाढल्या

यूट्यूब प्रीमियमच्या सर्व सब्सक्रिप्शन पॅकेजवर आता वाढलेल्या किमती लागू होतील. यामध्ये इंडिविज्युअल, फॅमिली आणि स्टुडंट प्लॅन्सचा समावेश आहे.

  • इंडिविज्युअल प्लॅन: आधी या प्लॅनची किंमत 129 रुपये होती. आता ती वाढून 149 रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये अॅड फ्री व्हिडीओ पाहणे, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि खास कंटेंट पाहायला मिळतो.

  • फॅमिली प्लॅन: हा प्लॅन आधी 189 रुपयेमध्ये मिळत होता पण आता त्याची किंमत वाढून ती तब्बल 299 रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये एकाच सब्सक्रिप्शन अंतर्गत 5 जणांना यूट्यूब प्रीमियमचा फायदा मिळतो.

  • स्टुडंट प्लॅन: हे सर्वात स्वस्तात पॅकेज आहे. आधी याची किंमत 79 रुपये होती जी आता वाढून 89 रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये इतर फायद्यांसह अॅड फ्री व्हिडीओ पाहण्याची सुविधा आहे.

नवीन सब्सक्रिप्शनसाठी फ्री ट्रायल

यूट्यूब प्रीमियम वापरायचे की नाही यावर तुम्ही अजूनही विचार करत असाल तर नवीन वापरकर्त्यांसाठी यूट्यूब 1 महिना मोफत ट्रायल ऑफर करत आहे. या ट्रायलमध्ये तुम्हाला सर्व फायद्यांचा अनुभव घेता येतो आणि नंतर सब्सक्रिप्शन घेण्याचा निर्णय घेऊ शकता.

प्रीपेड प्लॅन्सवरही वाढ

नियमित सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त यूट्यूब प्रीमियममध्ये प्रीपेड प्लॅन्सही आहेत. या प्लॅन्स स्वतःहून रिन्यू होत नाहीत त्यामुळे तुम्हाला त्यांचे मॅन्युअली रिन्यू करावे लागतात. या प्रीपेड प्लॅन्सवरही आता वाढलेल्या किमती लागू होतील.

यूट्यूब प्रीमियमच्या वाढलेल्या किमतीमुळे काही वापरकर्ते निराश झाले आहेत. पण जाहिरातींशिवाय व्हिडीओ पाहण्याचा अनुभव आणि इतर फायदे लक्षात घेता हा अजूनही लोकप्रिय पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT