Kaas Pathar Satara esakal
टूरिझम

Kaas Pathar : कास पठारावरील फुलं पहायला जाताय? मग 'इतके' पैसे सोबत ठेवाच, नाहीतर परत माघारी फिरावं लागेल!

'पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्‍पुरत्‍या स्वरूपात पन्नास रुपये शुल्‍क आकारण्‍याचा घेतला निर्णय'

सकाळ डिजिटल टीम

कास, त्‍याठिकाणचा पाऊस, धुके, झोंबणाऱ्या वाऱ्याचा अनुभव घेण्‍यासाठी सध्‍या राज्‍यभरातून पर्यटक येत आहेत.

सातारा : संततधार पावसामुळे (Heavy Rain in Satara) काससह परिसरातील निसर्गसौंदर्य वाढीस लागले आहे. फुलांच्‍या हंगामास कालावधी असला, तरी येणारे पर्यटक कास पठारासह (Kaas Pathar) परिसरातील ठिकाणांना भेटी देण्‍यास प्राधान्‍य देतात. यादरम्‍यान फुलण्‍याच्‍या तयारीतील असलेल्या दुर्मिळ वनसंपदेचे नुकसान होऊ नये, यासाठी त्‍यांना स्‍थानिक समिती मदत करत आहे.

यासाठी दिवसभर मनुष्‍यबळ लागत असल्‍याने कास संयुक्‍त वन व्‍यवस्‍थापन समितीने (Kas Forest Management Committee) पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्‍पुरत्‍या स्वरूपात पन्नास रुपये शुल्क ‍आकारण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्‍या दोन- तीन दिवसांत होण्‍याची शक्‍यता आहे.

जागतिक वारसास्‍थळाच्‍या यादीत समावेश असणाऱ्या कास येथील पठारावरील फुलांचा नजारा (Flower Season), सौंदर्य पाहण्‍यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आवश्‍‍यक सुविधा पुरविण्‍यासाठी सातारा वन विभाग तसेच स्‍थानिक वन व्‍यवस्‍थापन समिती कार्यरत असते. येणाऱ्या पर्यटकांकडून स्‍थानिकांना रोजगार प्राप्‍त होत असतानाच पठाराचे संवर्धन, संगोपनासाठी शुल्‍क आकारण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

हे शुल्‍क फक्‍त फुलांच्‍या हंगामापुरतेच मर्यादित असते. सध्‍याच्‍या पावसामुळे पठारावरील फुले फुलण्‍यासाठीचे पोषक वातावरण तयार झाले आहे. दुर्मिळ फुलांच्‍या हंगामास अजून अवधी आहे. कास, त्‍याठिकाणचा पाऊस, धुके, झोंबणाऱ्या वाऱ्याचा अनुभव घेण्‍यासाठी सध्‍या राज्‍यभरातून पर्यटक येत आहेत. सुटीच्‍या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्‍या हजारोंच्‍या घरात पोचते.

दूरवरून आलेले पर्यटक कास पठारावर फिरण्‍यास परवानगी देण्‍याची मागणी वन विभाग, स्‍थानिक समितीकडे करतात. या पर्यटकांना परिसराची माहिती नसल्‍याने अनेकदा त्‍यांच्‍याकडून फुलांसह इतर निसर्गसंपदेचे नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे त्‍या पर्यटकांसोबत समिती तसेच वन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांना फिरावे लागते.

हंगामास अवधी असतानाही पर्यटक पठारावरील कुमुदिनी तलाव, कास दर्शन गॅलरी, नैसर्गिक दगडी कमान पाहण्‍यास जात असल्‍याने त्‍यासाठीचे जास्‍तीचे मनुष्‍यबळ दररोज वापरावे लागत आहे. यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून तात्‍पुरत्‍या स्वरूपात पन्नास रुपये शुल्‍क आकारण्‍याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी येत्‍या दोन ते तीन दिवसांत होणार आहे. त्‍याची तयारी वन विभाग व स्‍थानिक समिती करत आहे.

आठ किलोमीटरचे तात्‍पुरते कुंपण..

पठारावरील मानवी हस्‍तक्षेप कमी करण्‍यासाठी उभारण्‍यात आलेले लोखंडी कुंपण वन विभागाने नुकतेच हटविले. हे कुंपण हटविल्यामुळे पठारावरील हुल्‍लडबाजीच्‍या घटनांमध्‍ये वाढ होण्‍यास सुरुवात झाली. यामुळे वन विभागाने त्‍याठिकाणी मुख्‍य रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा तात्‍पुरते जाळीदार कुंपण उभारले असून, त्‍याची लांबी आठ किलोमीटर इतकी आहे. या कुंपणामुळे वन्‍यप्राण्‍यांच्‍या वावरात अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT