Amarnath Yatra 2024 5 top tourist place Visit During Amarnath Yatra 
टूरिझम

Amarnath Yatra 2024 : अमरनाथला गेल्यावर 'या' ठिकाणांना अवश्य द्या भेट

सकाळ डिजिटल टीम

ज्या अमरनाथ यात्रेची सर्वजण प्रतीक्षा करत होते त्या अमरनाथ यात्रेला अखेर सुरुवात झाली आहे. अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आतुरलेले असतात. अमरनाथ यात्रेचा प्रवास अतिशय कठीण मानला जातो. हजारो भाविक बर्फाच्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी भाविक खडतर प्रवास करताना दिसतात. पण तुम्हाला माहितीय का, यात्रेदरम्यान मंदिरासोबत येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

अमरनाथ यात्रेदरम्यान, मंदिराव्यतिरिक्त या ठिकाणी १० प्रेक्षणीय स्थळे आहेत. तर ती कोणती हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पहलगाम

पहलगाममधील बेताब व्हॅली ही जगप्रसिद्ध आहे. व्हॅली पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक पहलगामला भेट देत असतात. या व्हॅलीमध्ये पाइनची झाडे, बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर नद्या आहेत.

या व्हॅलीसोबत तुलियन सरोवरसुद्धा पाहण्यासारखं आहे. या सरोवराचे सौंदर्य शद्बात वर्णन करता येणार नाही. हा तलाव बर्फाने झाकलेला आहे. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या चादरीने झाकलेला हा तलाव पर्यटकांचे लक्ष वेधतो.

तसेच, अरु व्हॅलीसुद्धा पाहण्यासारखी आहे. पहलगामपासून सुमारे 12 किमी अंतरावर असलेले एक सुंदर गाव , त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी, ट्रेकिंगसाठी आणि कोलाहोई ग्लेशियर ट्रेकसाठी आधार म्हणून ओळखले जाते.

बालटाल

बालटाल ही एक निसर्गरम्य दरी आहे जी भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी कॅम्पिंग ग्राउंड म्हणून काम करते. हे सिंध नदी आणि हिमनदीच्या प्रवाहांच्या संगमावर आहे. ही दरी हिरवीगार हिरवळ आणि भव्य पर्वतांनी वेढलेली आहे. कॅम्पिंगसाठी आणि प्रदेशातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे.

मार्तंड सूर्य मंदिर

भारतातील प्राचीन मंदिरांतील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक म्हणजे काश्मिरातील अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर. आठव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर कोणार्क सूर्य मंदिर, ओरिसा (13 वे शतक) आणि मोडेरा सूर्य मंदिर, गुजरात (११ ववे शतक) पेक्षा ही प्राचीन आहे. "मार्तंड" हे सूर्याचे संस्कृत नाव आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन राजे स्वत: ला "सूर्य-पुत्र" म्हणून संबोधत असत.

गुलमर्ग

गुलमर्गला फिरायला जावू शकता. तिथे प्रसिद्ध दरांग धबधबा आहे. फुलों के बाग जवळ फ्रोजन फॉलजवळ सेल्फी काढता येईल. आशियातील सर्वात उंच गोंडोला केबल कार येथे आहे. ज्याच्या राईडचा तुम्ही आनंद घेऊ शकता. गोल्फ कोर्स, चर्च आणि भेट देण्यासाठी इतर अनेक उत्तम ठिकाणे आहेत.

पंचतरणी

अमरनाथ गुहेपासून सुमारे 6 किमी अंतरावर असलेल्या यात्रेच्या मार्गावरील पंचतरणी हा शेवटचा तळ आहे . हे पाच प्रवाहांच्या संगमावर वसलेले आहे, म्हणून त्याला 'पंचतरणी' असे नाव पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT