kausani google
टूरिझम

ऑगस्टमध्ये फिरायला जायचा प्लॅन आहे? मग 'या' स्थळांना अवश्य भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : ऑगस्ट महिन्यात कुठेही फिरायला जायचा विचार केला तर आपण नक्कीच वर्षा पर्याटनाच्या ठिकाणी भेट देऊ. ज्याठिकाणी आपल्याला मान्सूनचा (monsoon picnic spot) सहज आनंद घेता येईल. तुमचा देखील ऑगस्टमध्ये बाहेर जाण्याचा प्लॅन असेल तर आज आम्ही तुम्हाला उत्कृष्ट ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. याठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्हा परत परत भेट द्यायची इच्छा होईल. (best places to visit in monsoon)

कौसानी -

कौसानी हे उत्तराखंडातील एक स्थळ असून अनेकांना याबाबत माहिती नाही. नैसर्गिक सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास नैनिताल, केरळ आणि पचमढी इत्यादीपेक्षाही हे ठिकाणी चांगले आहे. हे छोटेशे खेडे असून नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. हिरवळ, देवदार वृक्ष आणि सर्वत्र हिमालयातील आकर्षक शिखरे, असे मनमोहक दृश्य याठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. येथे आपण रुद्रधारी फॉल्स, कौसानी टी इस्टेट आणि ग्वाल्दम सारख्या उत्कृष्ट ठिकाणी देखील भेट देऊ शकता.

मावलिननॉन्ग -

पूर्व भारतात भेट देण्यासारखी एकच नाही, तर अनेक अविस्मयकारक ठिकाणे आहेत. जसे- दार्जिलिंग, आसाम, अरुणाचल प्रदेश इत्यादी. मात्र, ऑगस्ट महिन्यात कोणत्याही ठिकाणी पूर्व भारतात भेट देण्यासाठी सर्वात प्रसिद्ध असेल तर त्याचे नाव मावलिननॉन्ग आहे. शिलाँगपासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर वसलेले हे एक छोटेसे गाव असून ते 'गॉड्स ओन गार्डन' म्हणून प्रसिद्ध आहे. हे आपल्या चित्तथरारक आणि अविश्वसनीय दृश्यांसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे आपण मावलिननॉन्ग फॉल्स, डाकी नदी आणि स्काय व्यू या स्थळांना भेट देऊ शकता.

माळशेज घाट -

समुद्रसपाटीपासून सातशे मीटर उंचीवर माळशेज घाट हे महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. ऑगस्टमध्ये निसर्गप्रेमींसाठी हे हिल स्टेशन अतिशय खास आहे. हे हिल स्टेशन जगभरात चैतन्यशील हवामान आणि विशेषतः पावसाळ्यात हिरव्या नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे आपण माळशेज धबधबे आणि पिंपळगाव जोगी धरण यासारख्या उत्कृष्ट ठिकाणी देखील भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT