हेम्मडगा आणि कणकुंबी-चोर्ला हे गोवा राज्याला जोडणारे मार्ग भीमगड वन्यजीव अभयारण्यातून जातात.
खानापूर : उत्तर कन्नड (Uttara Kannada) जिल्ह्यातील वन खात्याने (Forest Department) संरक्षित काळी अभयारण्यातील प्रवासाला टोल आकारण्यास सुरुवात केली असून त्याच धर्तीवर तालुक्यांतील संरक्षित भीमगड अभयारण्यातील मार्गांवर टोल लावण्यात यावा, यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती भीमगड अभयारण्याचे आरएफओ राकेश अर्जुनवाड यांनी दिली आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील वनखात्याने एप्रिलअखेरीस हा आदेश जाहीर केला आहे. आदेशानुसार जोईडा तालुका वनाधिकाऱ्यांनी आपल्या व्याप्तीतील रस्त्यांवर टोल नाके (Toll) उभारले आहेत. गोव्यातून खानापूरला जोडणाऱ्या हेम्मडगा रस्त्यावरील अनमोड फॉरेस्ट चेक पोस्टवर टोल लावण्यास सुरुवात केली आहे.
हलक्या वाहनांना २० रुपये, तर अवजड वाहनांना ५० रुपये शुल्क आकारले जात असून, त्याची पावती देण्यात येत आहे. जमा झालेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धनासाठी, तर उरलेली रक्कम वन्यजीव संरक्षण निधीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
स्थानिकांना या टोलमधून सूट दिली जाणार असून, अभयारण्यातून (Bhimgad Sanctuary) वाढलेल्या वाहतुकीमुळे अभयारण्याच्या परिसंस्थेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी टोलच्या अनुषंगाने त्यावर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.
हेम्मडगा आणि कणकुंबी-चोर्ला हे गोवा राज्याला जोडणारे मार्ग भीमगड वन्यजीव अभयारण्यातून जातात. सध्या वन्य प्राण्यांचे अपघात टाळण्यास हेम्मडगा मार्गांवरील रात्री वाहतुकीस निर्बंध लावले आहेत. पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही या ठिकाणाहून वाहतूक वाढली असून ती वन्यजीव घटकांना अपायकारक ठरत आहे. हे रोखण्यासाठी उत्तर कन्नड जिल्ह्यातील वनखात्याच्या धर्तीवर दोन्हींही ठिकाणी शुल्क आकारण्याचा विचार बेळगावचे वन अधिकारी करत आहेत. सध्या शेडेगाळी चेकपोस्टवर टोलनाका उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा वनाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
- राकेश अर्जुनवाड, आरएफओ, भीमगड अभयारण्य
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.