Bike Rider esakal
टूरिझम

Bike Rider :सांगलीचा योगेश बाईकने करणार जगप्रवास;मुंबई ते लंडन व्हाया बाईकचा बांधलाय चंग!

सकाळ डिजिटल टीम

आपण भारतीयांना युरोप खंडाचे तसे नेहमीच आकर्षण राहिले आहे.  लंडन, पॅरिस, रोम सारखी अतिप्रगत शहरे आहेतच पण सोबतीला आल्प्स   पर्वतराजीत विसावलेली सुंदर सुंदर खेडीइटली चे सुंदर समुद्रकिनारे, या गोष्टी नेहमीच आपल्याला आकर्षित करतात.

हे सर्व देश तिथलं सौंदर्य पाहण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. हा पण विमान खर्च परवडणारा नाही त्यामूळे अनेकांचे परदेश भ्रमणाचे स्वप्न अपूर्ण राहते. पण. एका तरूणाने हे स्वप्न बाईकवरून सत्यात उतरवले आहे.

आज आपण माहिती घेणार आहोत अशाच एका अवलीयाची ज्याने ही कल्पना सत्यात  उतरविण्याचा घाट घातलाय. योगेश आलेकरी मूळचा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालूक्यातील करांडेवाडी गावचा आहे. पण सध्या नवी मुंबई येथे स्थायिक असलेल्या या तरुणास प्रवासाचे भारी वेड. त्यातही बाईक राईड हा त्याचा आवडता छंद. 

बाईक घेऊन फिरत रहायचे मग कोणी सोबत असो वा नसो. या सफरी मधूनच मग उत्तरेला उत्तुंग हिमालयाच्या पर्वतरांगा अगदी अरूणाचल ते काश्मीर पर्यंत पालथ्या घालून झाल्या आहेत. लडाख ,स्पिती ही सर्वांची ड्रीम राईड ही योगेशने अनेकदा पूर्ण केलीय.

भारत असा उभा अडवा फिरून झाल्यावर याला देशाबाहेरील रस्त्यांवर गाडी चालवावी न वाटावी तर च नवलच..! योगेशने या दरम्यान नेपाळ, भूतान दक्षिण आशियाई देश कंबोडिया व व्हिएतनाम याही देशांत दुचाकी भ्रमंती केली आहे.अशा या धाडसी तरूणाने आता चंग बांधलाय तो म्हणजे मुंबई ते लंडन दुचाकी वारीचा.!

मे महिन्यात १ मे या दिवशी हा तरुण लंडनस्वारीला निघणार आहे. या त्याच्या आगामी नियोजित बाईक राईड मध्ये 24 देश, ३ खंड आणि 25000+ किलोमीटर असा भरगच्च कार्यक्रम असेल.

योगेश पर्यावरणाचा संदेश घेऊन हा सर्व प्रवास करणार आहे. त्यासाठी त्याने Ride For LiFE असे या राईड चे नामकरण ही केलेले आहे. LiFE म्हणजे Lifestyle for environment.

कसा असेल प्रवास भारत,नेपाळ, दुबई, इराण, तुर्की आणि मग पुढे तो युरोपियन देशांत प्रवेश करून इंग्लंड मध्ये पोहचेल त्यानंतर पुन्हा दक्षिणेकडे प्रयाण करत आफ्रिकेतील मोरोक्को या देशात काही दिवस  Ride करुन पुन्हा पोर्तुगाल स्पेन करून परतीचा प्रवास सुरु होईल.    

लंडनमध्ये हे पाहण्याचा आहे मानस

इंग्लंड चा मुक्कामात ब्रिटिश लायब्ररी, वीर सावरकर, गांधीजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निवासस्थाने पाहण्याची इच्छा याठिकाणी योगेश ने व्यक्त केली. त्याबरोबरच थेम्स नदीचे खोरे वेल्स चा स्वच्छ सुंदर कन्ट्री साईड भाग, ऑक्सफर्ड-केम्ब्रिज विद्यापीठं ही पाहण्याचा मानस आहे.

बाईकसाठी खास परवाना  

आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना बनवून घ्यावा लागतो. त्याच बरोबर जर अशी रोड ट्रिप स्वताच्या वाहनाने करणार असेल तर सर्वांत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे कार्नेट हे एक कास्टम कागदपत्र आहे. किंवा आपण त्याला बाईक चा पासपोर्ट सुध्दा म्हणू शकतो.  कारनेट मिळवणे हे सर्वात खर्चिक काम असते, यासाठी आपल्याला काही लाख रुपये मोजावे लागतात. आणि त्याची वैधता फक्त एका वर्षासाठी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT