Christmas 2022 esakal
टूरिझम

Christmas 2022 : ऐतिहासिक वारसा! कोल्हापूरात आहेत 165 वर्षांचे चर्च!

प्राचीन स्थापत्यकलेची झलकही या कोल्हापूराती जून्या चर्चमध्ये दिसते

सकाळ डिजिटल टीम

भावा हे कोल्हापूर हाय. इथे कशाची बी कमी न्हाई. पश्चिम महाराष्ट्रातील एक सदन जिल्हा म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरकरांची प्रत्येक गोष्ट खास आहे. कोल्हापूरला ऐतिहासिक वारशाबरोबरच धार्मिक वारसाही लाभला आहे. अनेक जातीधर्माचे लोक कोल्हापूरात आहेत. त्यामूळे कोल्हापूराच्या सुरूवातीला एकीकडे चर्च, त्याच्या पुढील बाजूस मस्जिद आणि या दोन्हीच्या समोरील बाजूस नवदुर्गेतील एका देवीचे मंदिर आहे.

कोल्हापूरात जसे अनेक देवीदेवतांची मंदिरे आहेत. तसेच तिथे काही प्रमुख चर्च देखील आहेत. कोल्हापुरातही ख्रिश्‍चन बांधवांची संख्या लक्षणीय आहे. येथील ऐतिहासिक चर्चमध्ये भक्तिभावाने भगवान प्रभू येशू ख्रिस्तांची उपासना केली जाते. वायल्डर मेमोरियल चर्च, पवित्र सुवार्तिकांचे मंदिर, ऑल सेंटस चर्च, होलिक्रॉस चर्च, सेंव्हथ डे चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज, ख्रिश्‍चन चर्च आदी चर्चेस येथे आहेत. 

आज आम्‍ही तुम्‍हाला कोल्हापूरातील काही चर्चबद्दल सांगणार आहोत. जे इतर चर्चपेक्षा खूप मोठे तर आहेतच. शिवाय प्राचीन स्थापत्यकलेची झलकही यात आहे. जगभरात एकापेक्षा एक प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. काही त्यांच्या किर्तीमुळे तर काही भक्तांच्या श्रद्धेमुळे प्रसिद्ध आहेत.

वायल्डर मेमोरियल चर्च

कोल्हापूरातील महत्त्वाचा परिसर म्हणजे भाऊसिंगजी रोड. या रोडवरच कोल्हापूरची महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेच्या इमारतीशेजारी वायल्डर मेमोरियल चर्च आहे. कोल्हापुरातील सर्वांत जुने चर्च आहे. या चर्चला सुमारे १६५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चर्चची स्थापना अमेरिकन मिशनरी रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी १८५७ मध्ये केली होती. या चर्चसाठी लागणारा दगड रंकाळ्याच्या खाणीतून स्वता रेव्हरंड वायल्डर गोल्ड यांनी खोदून आणला. त्यामुळे या चर्चला त्यांचेच नाव देण्यात आले होते.

 

वायल्डर मेमोरियल चर्च

ब्रह्मपूरी सुवार्तिकांचे मंदिर
रत्नागिरीकडून कोल्हापूर शहरात प्रवेश करतानाच पंचगंगा नदी ओलांडल्यानंतर ब्रह्मपुरी परिसर लागतो. या परिसरातील मेन चौक ओलांडल्यावर चढतीला एक जूना चर्च दिसतो. त्याला पवित्र सुवार्तिकांचे मंदिर म्हणून ओळखतात. हा चर्च ही १०० वर्ष जूना आहे. याच चौकात एकीकडे चर्च तर तिथेच नवदुर्गेतील दुर्गामाता आणि मशिदही आहे. त्यामुळे कोल्हापूरातील सर्वधर्मियांचे ऐक्य दिसून येते.

ब्रह्मपूरी सुवार्तिकांचे मंदिर

विक्रमनगर चर्च

विक्रमनगर येथील चर्चलाही ५० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. २०००मध्ये नवी इमारत बांधली आहे. या प्रमुख चर्चबरोबरच शहरात इतरही अनेक ठिकाणी चर्च आहेत. होलिक्रॉस चर्च, सेंव्हंथ डे ॲडव्हेनटीज चर्च, पेन्टिकॉस्ट चर्चचा यात समावेश होतो.

विक्रमनगर चर्च

ऑल सेंटस चर्च

ब्रिटीशकालीन बांधणीतील ऑल सेंटस हेही ऐतिहासिक चर्च आहे. ते ताराबाई पार्कात आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे हे चर्च अनेकांचे लक्ष वेधून घेते. हे चर्च १८८१ मध्ये बांधले आहे.

ऑल सेंटस चर्च

ख्राईस्ट चर्च केडीसी

कोल्हापूर डायेसीस कोन्लिसचे नागाळा पार्क येथे ख्राईस्ट चर्च आहे. या चर्चचे पाचशेहून अधिक सभासद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हे चर्च उभे आहे.

ख्राईस्ट चर्च केडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT