Summer Travel esakal
टूरिझम

Summer Travel : एप्रिलमध्ये कुटुंबासोबत फिरण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' ठिकाणे, उन्हाळ्यात मिळेल थंडावा

Summer Travel : उन्हाळ्यात कुटुंबासोबत फिरण्यासाठी एप्रिल हा महिना बेस्ट मानला जातो. कारण, मे महिन्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढतो.

Monika Lonkar –Kumbhar

Summer Travel : एप्रिल महिन्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. याच महिन्यात उन्हाचा उकाडा देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये बाहेर फिरायला जायला सगळ्यांना आवडते. उन्हाळ्यात कुटुंबासोबत फिरण्यासाठी एप्रिल हा महिना बेस्ट मानला जातो. कारण, मे महिन्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढतो. त्यामुळे, एप्रिल महिन्यात फिरायला जाण्याचे प्लॅन्स खास करून बनवले जातात.

या कडक उन्हापासून कुठेतरी लांब आणि थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यावर लोकांचा भर असतो. या एप्रिल महिन्यात तुम्ही देखील कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला भारतातील काही अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही कडक उन्हाळ्यात फिरण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

मसूरी

'पर्वतांची राणी' म्हणून ओळखले जाणारे मसूरी हे शहर उत्तराखंडमध्ये स्थित आहे. या राज्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये मसूरीचा समावेश होतो. येथील आल्हाददायक वातावरण आणि सुंदर नजारे तुम्हाला भुरळ घालतील यात काही शंका नाही.

विशेष म्हणजे मसुरीमध्ये एप्रिल महिन्यातील तापमान हे १४ °C ते २९°C पर्यंत असते. या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्हाला येथील अनेक प्रेक्षणीय पर्यटनस्थळांना भेट देता येईल. (Mussoorie)

चेरापूंजी

मेघालय या राज्यात स्थित असलेले हे ठिकाण अतिशय लोकप्रिय आहे. भारतामध्ये सर्वाधिक पाऊस याच ठिकाणी पडतो. त्यामुळे, येथील वातावरण १२ ही महिने थंडगार असते. कडक उन्हाच्या झळांपासून आराम मिळवण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी तुम्ही चेरापूंजी या ठिकाणचा विचार करायला काहीच हरकत नाही.

या ठिकाणी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. ज्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. खास करून येथील धबधबे, उद्याने, उंच पर्वत तुम्हाला भुरळ घालतील यात काही शंका नाही. (Cherrapunji)

गंगटोक

सिक्कीम या राज्याची राजधानी असलेले हे शहर देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. गंगटोकचे निसर्गसौंदर्य जगात लोकप्रिय आहे. त्यामुळे, या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी पहायला मिळते. या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातील येथील तापमान १५ ते २१.१ °C पर्यंत असते. त्यामुळे, उन्हाळ्यात या ठिकाणी तुम्हाला आल्हाददायक वातावरणात मस्त वेळ घालवता येईल. (Gangtok)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT