Kona Coffee  Sakal
टूरिझम

Kona Coffee: कोना कॉफीसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील एकमेव राज्य 'हवाई'

Kona Coffee: कोना कॉफीला अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी `कोना कॉफी शिष्यवृत्ती’ तसेच सौंदर्य स्पर्धा, आयोजित केल्या जातात. येत्या 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान `कोना कॉफी सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे.

विजय नाईक,दिल्ली

Kona Coffee: हवाईतील सात बेटांपैकी बिग आयलँड हे सर्वात मोठे. त्याचा विस्तार 4 हजार चौरस मैल आहे. लांबी 93 मैल व रुंदी 73 मैल. त्याला 266 मैलाचा समुद्र किनारा आहे. त्यात 13796 फूट उंच मौना किया व 13677 फूट उंच मौना लोआ हे दोन पर्वत आहेत.

शिवाय किलाउएवा हा ज्वालामुखी मिळून तीन जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांचे विस्फोट अधुनमधून होत असतात. बिग आयलँड हे हवाईतील सर्वात तरूण बेट. त्याचं वय 10 लाख वर्षापेक्षा किंचितचे अधिक आहे. मौना किया हा जगातील सर्वात उंच पर्वत असून त्याची एकूण उंची 33,503 फूट आहे. त्यापैकी 13,803 फूट जमिनीच्या पृष्ठ भागावर व 19700 फूट जमिनीखाली प्रशांत महासागरात आहे. हिमालयाची उंची 29,031.69 फूट आहे.

गेल्या वर्षी किलाउएवा ज्वालामुखीचा उद्रेक पाहाण्यास मिळाला. पण, यावेळी तिन्ही ज्वालामुखी सूप्तावस्थेत आहेत. तथापि, त्यातून वर्षानुवर्ष बाहेर पडणाऱ्या लाव्हामुळे त्यांच्या परिसरात मैलौन मैल पसरलेल्या व सुकलेल्या काळ्या कुट्ट् लाव्हाचे वाळवंट दिसते. त्या वाळवंटातही तग धरून बसलेली व उगवणारी झाडे-झुडपे, पक्षी यांचे दर्शन तर होतेच, पण लाव्हांच्या वजनाने जमिनीला पडलेले महाकाय खड्डे (क्रेटर्र्स) पाहायला मिळतात. किआउएवाच्या सान्निध्यात असलेल्या सल्फऱ (गंधक) बँकच्या मधोमध बांधलेल्या रस्त्यावरून जाताना दिसणाऱ्या गंधकाच्या वाफा व स्टीम व्हेन्ट्समधून निघणारी वाफ (वाफेची मोठमोठी छिद्रे) एक वेगळाच अनुभव देऊऩ जातात. लाव्हाने छेदलेल्या व मैलोन मैल पसरलेल्या लाव्हा ट्युब्ज (गुहा) हे आणखी एक वैशिष्ठ्य.

बिग आयलँडची राजधानी हिलो व दुसरे महत्वाचे शहर म्हणजे कोना. कोनामध्ये सुमारे 35 मैल लांब असलेल्या पट्ट्यात शेती होते, ती जगप्रसिद्ध कोना कॉफीची. प्रशांत महासागराच्या सान्निध्यात समुद्र सपाटीपासून सुमारे 500 ते 2300 फूट उंचीवर शेती पसरलेली आहे. गेल्या आठवड्यात बिग आयलँडच्या दौऱ्यात प्रसिद्ध कोना कॉफीच्या `ग्रीनवेल’ शेताला भेट देण्याची संधि मिळाली. हिरव्यागार परिसरात पाच ते सहा एकरात पसरलेली ही शेत जमीन हेन्री निकोलस ग्रीनवेल या व्यापाऱ्याची. 1870 पासून तो कॉफीची शेती करीत होता. पण, पहिली निर्यात झाली ती 1850 मध्ये कॅलिफोर्नियाला. विकिपिडीयावरील माहितीनुसार, 2019-20 मध्ये हवाईतील कॉफीच्या उत्पादनाचे प्रमाण 102.9 दशलक्ष डॉलर्स होते. कॉफीची शेती 6900 एकरावर होत होती. एयतिहासित माहितीनुसार, ``डॉन फ्रान्सिस्को डी पौला मार्टीन याने 1813 मध्ये ओआहू बेटावर कॉफीची लागवड केली. पण, 1873 मध्ये व्हिएन्ना येथे झालेल्या जागतिक मेळाव्यात ग्रीनवेल यांच्या कॉफी उत्पादनाला (कोना कॉफी) सर्वोत्तम कॉफीचा पुरस्कार मिळाला, तेव्हापासून ती प्रसिद्ध झाली.’’ ``आज एकरामागे 1400 पौंड कॉफीचे उत्पादन होते,’’ असे नेटने सांगितले.

फार्मला भेट देणाऱ्यास तेथे ठेवलेल्या पॉट्समधून निरनिराळ्या कॉफीचा निःशुल्क स्वाद घेता येतो. हवाईत होणाऱ्या कॉफीत अरेबिका (कोना टिपिका), बोरबॉन, कॅटुरा, कॅटुई, गैशा, रॉयल कोना, अमाना, डॉन फ्रान्सिस्को, कोना मौन्टन, मुलवाडी आदीं प्रकारच्या कॉफींचा समावेश आहे. फार्मला भेट देताना कॉफीचे `मिडियम रोस्ट,’ `प्रायव्हेट रिझर्व,’ `फुलसिटी रोस्ट,’ `कॅमेलिऑन,’ `जेनी के,’ `फ्रेन्च रोस्ट,’ `ऑटम स्पाईस,’ `पीबेरी,’ `मॅकॅडेमिया नट’ या वेगवेगळ्या कॉफींचे स्वाद घेता आले.

अमेरिका, युरोपमध्ये लोक काळी कडवट कॉफी पिणं पसंत करतात. पण भारतीय माणसाला आवडते ती दूध व साखर मिश्रित कॉफी. या पट्ट्यातील जमीन, पिकाला आवश्यक असणारे ऊन, हवामान व त्यातील बाष्पाचे प्रमाण इतके चांगले आहे, की 35 मैलाच्या परिसरात शंभरावर अधिक कॉफी फार्मस् आहेत. जगातील सुमारे 80 देशात कॉफीचे उत्पादन होते. परंतु, कोना कॉफीचे वैशिष्ठ्य म्हणजे कॉफीचे उत्पादन करणारे अमेरिकेतील एकमेव राज्य म्हणजे हवाई होय. त्याच प्रमाणे रूद्राक्षांचे अमेरिकेतील एकमेव जंगल हवाईतील कौवाई या बेटावर आहे.

हवाईतील कॉफी उत्पादकांनी केलेल्या जाहिरातीनुसार, ``कॉफीतील कॅफिन हे माणसाला केवळ उत्साहित करीत नाही, तर तरतरी आणते, स्वप्न व नियतीला प्रेरित करते, कॉफी जीवन जगण्याचा केवळ एक प्रकार नव्हे, तर जीवनच आहे.’’ कोना कॉफीला अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी `कोना कॉफी शिष्यवृत्ती’ तसेच सौंदर्य स्पर्धा, आयोजित केल्या जातात. येत्या 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान `कोना कॉफी सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे.

भारतामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळ नाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम या राज्यात कॉफीचे उत्पादन होते. तथापि, एकूण उत्पादनाच्या तब्बल 71 टक्के उत्पादन कर्नाटकात होते. त्यापैकी कोडागू (कूर्ग) जिल्ह्यात 33 टक्के उत्पादन होते. चिकमगलूर, हसन, शिमोगा म्हैसूर हे जिल्हे उत्पादनात आघाडीवर आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, 18 ते 20 टक्के भारतीय रोज चहा अयवजी कॉफी घेतात. जगातील कॉफी निर्यात करणाऱ्या देशात भारताचा 8 वा क्रमांक लागतो. 2023-2024 मध्ये भारताने 1.28 अब्ज डॉलर्स किंमतीची कॉफी निर्यात केली. प्रामुख्याने ती रशिया, इटली, तुर्की, जर्मनी व संयुक्त अरब अमिरात या देशांना निर्यात होते. जगाच्या एकूण कॉफी उत्पादनापैकी 3 टक्के कॉफीचे उत्पादन भारतात होते. आपल्या देशात लोकप्रिय असलेल्या कॉफीत प्रामुख्याने अरेबिका व रोबुस्टा यांचा समावेश होतो. कॉफीशेतीत सुमारे 20 लाख लोकांना रोजगार मिळत असून, 2023-24 मध्ये भारताने 3.6 लाख मेट्रिक टन कॉफीचे उत्पादन केले. अरेबिका, रोबुस्टा, स्टारबक्स व बरिस्ता प्रमाणेच कोना कॉफीही भारतीयात लोकप्रिय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT