Plan Trip to make Father's Day 2024 Special: दरवर्षी फादर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा 16 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस वडिलांना समर्पित आहे. फादर्स डेच्या माध्यमातून वडिलांचा कठोरपणाच्या मागे दडलेल्या त्याग, काळजी आणि आपुलकीचा सन्मान केला जातो आणि प्रत्येक पुरुषाला वडील म्हणून आदर दिला जातो.
फादर्स डेच्या निमित्ताने मुलं आपल्या वडिलांना खास वाटण्यासाठी विविध गोष्टी करतात. यावेळी फादर्स डे नंतर दुसऱ्या दिवशी ईदची सुट्टी आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला वीकेंडचे नियोजन करता येईल. वडिलांसोबत अविस्मरणीय वेळ घालवण्यासाठी पुढील सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.
जर तुम्हाला जास्त सुट्ट्या नसतील तर तुम्ही तुमच्या शहराजवळ असलेल्या अॅडव्हेचर आयलँडला भेट देऊ शकता. येथे तुम्ही विविध राइड्स, स्लाइड्स आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
तुम्ही वडिलांसोबत सुंदर आणि निसर्गरम्य अशा नैनिताललाही जाऊ शकता. दोन दिवसांच्या सुट्टीत नैनितालची ट्रिप अविस्मरणीय बनवू शकता. नैनितालला जाण्यासाठी काठगोदाम येथून बस किंवा टॅक्सी मिळू शकते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही स्वतः गाडी चालवून रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही फादर्स डे निमित्त रोड ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल तर लोणावळा, पानशेत, खडकवासला यासारख्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही तुमच्या वडिलांसोबत गाडी चालवू शकता. अशा प्रकारची सहल बजेटमध्येही असेल आणि मजेदारही.
तुम्हाला कोणत्याही हिल स्टेशनवर जायचे असेल तर मसुरीला जाऊ शकता. यंदा फादर्स डे रविवार येत असून तुम्ही लाँग विकेंड प्लॅन करून मसुरीला जाऊ शकता. मसुरीमध्ये तुम्ही कॅम्प्टिफॉल, दलाई हिल्स, मॉल रोड, सुरकंदा माता मंदिर, धनौल्टी यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.