Gift your sister a tour package on Raksha Bandhan rajasthan famous places 
टूरिझम

Raksha bandhan: फिल्मी स्टाईलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं आहे ? या ठिकाणी प्लॅन करा ३ दिवसाची ट्रीप

यंदाच्या रक्षाबंधननिमित्ता तुम्ही तुमच्या बहिणीला काहीतरी हटके गिफ्ट द्या ज्यामुळं तुमची बहिण जाम खुश होईल.

सकाळ डिजिटल टीम

भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण-भावाचे नाते म्हणजे बालपणातील त्या दंगा, मस्ती, खोड्या आठवतात. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पोर्णिमेला येतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. त्याच्या प्रगती अन् दिर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. तर भाऊ बहिणाला आयुष्यभर तुझं रक्षण करणार असं वचन देतो. पण यासर्वासोबता सध्याच्या जगात बहिण भावाकडून दरवर्षी काही ना काही तर खास गिफ्ट घेत असते. हक्काने आपल्या भावाकडे प्रत्येक गोष्ट बहिण या दिवशी मागते.

तर यंदाच्या रक्षाबंधननिमित्ता तुम्ही तुमच्या बहिणीला काहीतरी हटके गिफ्ट द्या ज्यामुळं तुमची बहिण जाम खुश होईल. यंदाच रक्षाबंधन 19 ऑगस्ट ला आहे. त्यामुळं तुम्ही विकेंडला बहिणीसोबत टूर प्लॅन करु शकता. प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो. तुमच्या बहिणीला सरप्राईज ट्रिप आवडेल. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे धनक चित्रपटाचे शूटिंग झाले होते.

जैसलमेरमध्ये बहिणीसोबत कॅम्पिंगला जा

ऑगस्टमध्ये देशातील अनेक भागात पाऊस पडतो, त्यामुळे प्रत्येकाला प्रवास करताना अडचणी येतात. पण राजस्थानमध्ये इतका पाऊस तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीसोबत टूर प्लॅनचे आयोजन करु शकता.

जैसलमेरला राजस्थानचे सोनेरी शहर म्हटले जाते, कारण येथील सोनेरी वाळूवर फिरणे सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला इथे काही रॉयल अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही इथल्या रिसॉर्टमध्ये एका रात्रीचा प्लॅन करु शकता. येथील सोन्यासारखा दिसणारा पिवळा किल्ला भारतातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.

याशिवाय वाळूच्या ढिगाऱ्यावर तंबू ठोकून तुम्ही येथे रात्र काढू शकता. हा अनुभव तुम्ही विसरू शकणार नाही. जैसलमेरपासून 40 किमी अंतरावर असलेल्या वाळवंटी भागात लक्झरी आणि मध्यम-श्रेणी कॅम्पिंग सुविधा उपलब्ध आहेत.

याशिवाय सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही गडीसर तलावाला भेट देण्यासाठी जाऊ शकता.

बीदासरला भेट द्या

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील बिदासरमध्येही चित्रपटाची अनेक दृश्ये शूट करण्यात आली आहेत. जर तुम्हाला राजस्थानची संस्कृती जवळून पाहायची असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता.

येथे तुम्हाला छोटी शहरे, झोपड्या, मातीची घरे आणि अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील ज्या तुम्हाला राजस्थानच्या इतर ठिकाणी सापडणार नाहीत. इथल्या गावाचं दृश्य पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या बहिणीसोबत जाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT