कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल दहा दिवस उशिरानं सुरू होत आहे.
सातारा : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील (Kaas Pathar) फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल दहा दिवस उशिरानं सुरू होत आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा (Kaas Plateau Flowering Season) आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना यावर्षी खुलं करण्यात येणार असून 9 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकिंग (Online Booking) सुरू होणार असल्याचा निर्णय वनसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
चालू वर्षीचा हंगाम हा शनिवार दिनांक 10 सप्टेंबर पासून सुरू करत असल्याची माहिती कास पठार कार्यकारी समिती (Kas Plateau Executive Committee), तसेच वनविभाग सातारा (Forest Department Satara) यांच्याकडून देण्यात आलीय. कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हंगामासाठी साधारणपणे 150 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलीय. कास पठाराच्या दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आलीय.
सातारा जिल्ह्याची शान असलेल्या कास पठाराची आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. येणाऱ्या काही दिवसांत हे कास पठार आता फुलांनी बहरु लागणार असल्यामुळं हा दौरा करण्यात आला. या दौऱ्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jaivanshi) यांच्यासह जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, पर्यटनमंत्र्यांचे स्वीय सहाय्य गौतम पठारे, उपप्रादेशीक परिवहन विभागाचे वरिष्ठ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, परिवहन महामंडळाचे अधिकारी इत्यादी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कास पठारावर सद्यस्थितीत गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर यासह अनेक प्रजातींची फुले पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. येत्या एक ते दोन दिवसात फुलांचे गालीचे तयार होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता कास पठारावरील फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.