Holi 2024 esakal
टूरिझम

Holi 2024 : मथुरा-वृंदावनमध्ये साजऱ्या होणाऱ्या रंगोत्सवात सहभागी व्हायचंय? मग, फिरायला जाण्याचा करा प्लॅन

Holi 2024 : भारतातील अनेक राज्यांमध्ये होळी विविध प्रकारे साजरी केली जाते. प्रत्येक राज्यामध्ये होळीच्या काही वेगळ्या परंपरा देखील आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Holi 2024 : भारतात विविध प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा आणि होळी इत्यादी अनेक सणांची आपल्याकडे मोठी धामधूम असते. आता अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. यंदा होळी २४ आणि २५ मार्चला साजरी होणार आहे. २४ मार्चला होलिका दहन केल्यानंतर २५ मार्चला रंगांची होळी खेळली जाईल.

यंदा होळीच्या दरम्यान, विकेंड देखील आला आहे. त्यामुळे, ३ दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही होळी मस्त एंजॉय करू शकता. भारतातील अनेक राज्यांमध्ये होळी विविध प्रकारे साजरी केली जाते. प्रत्येक राज्यामध्ये होळीच्या काही वेगळ्या परंपरा देखील आहेत.

त्यामुळे, या विकेंडला तुम्ही होळीच्या निमित्ताने फिरायला जाण्याचा प्लॅन ही करू शकता. उत्तर प्रदेशातील वृंदावन-मथुरेतील होळीचा उत्सव हा वेगळा आहे. येथील होळी आणि रंगोत्सव पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक गर्दी करतात. होळीच्या निमित्ताने तुम्ही देखील मित्र-मैत्रिणींसह किंवा कुटुंबासह मथुरा-वृंदावनला फिरायला जाऊ शकता.

मथुरा-वृंदावनला फिरायला कसे जायचे?

तुम्ही रेल्वेने मथुरा-वृंदावनला जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आधी दिल्लीपर्यंत रेल्वेने जावे लागेल. त्यानंतर, तुम्ही दिल्लीतून बसच्या मदतीने वृंदावन-मथुरेला जाऊ शकता. बसने जाण्यासाठी तुम्हाला जास्त भाडे देण्याची गरज पडणार नाही. अवघ्या २०० रूपयांमध्ये तुम्ही मथुरा-वृंदावनला जाऊ शकता.

मधुरेत राहण्याची आणि जेवणाची जास्त किंमत नाही. तुम्हाला या ठिकाणी एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये रू.५०० ते ३००० पर्यंत राहण्यासाठी रूम मिळू शकते. त्यानंतर, जेवण आणि नाश्त्यासाठी तुम्हाला ५०० ते १००० रूपये खर्च करावे लागतील.

लाठमार होळी खेळल्यानंतर तुम्ही येथील कृष्णजन्मभूमी, बांके बिहारी मंदिर, प्रेम मंदिर, रंगनाथ मंदिर आणि मथुरेपासून जवळ असलेल्या बरसानाला देखील भेट देऊ शकता.

मथुरा-वृंदावनची लाठमार होळी

उत्तर प्रदेशातील मथुरा-वृंदावनची होळी जगात प्रसिद्ध आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. येथील होळीची अनोखी परंपरा म्हणजे लाठमार होळी होय. ही लाठमार होळीची अनोखी परंपरा मथुरा-वृंदावनला लाभली आहे. त्यामुळे, येथील होळी पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी अनेक पर्यटक भगवान श्रीकृष्णाच्या शहरात अर्थात वृंदावनला येतात.

येथील द्वारकाधीश मंदिर आणि वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. देश-विदेशातील लोक ही होळी खेळण्यासाठी ३-४ दिवस आधीच हजेरी लावतात. या लाठमार होळीच्या परंपरेत स्त्रिया पुरूषांवर लाठ्या किंवा काठ्यांनी मारतात आणि त्यांना रंग देखील लावतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT