Lakshadweep Tourism  esakal
टूरिझम

Lakshadweep Tourism : लक्षद्वीपला जाण्यासाठी एंट्री परमिट कसे मिळवायचे? जाणून घ्या 'हे' नियम

लक्षद्वीप हा भारताचा अतिशय सुंदर, नयनरम्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे. या प्रदेशाचे सौंदर्य देशी-विदेशी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.

Monika Lonkar –Kumbhar

Lakshadweep Tourism : लक्षद्वीप हा भारताचा अतिशय सुंदर, नयनरम्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे. या प्रदेशाचे सौंदर्य देशी-विदेशी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. त्यामुळे, लक्षद्वीपमध्ये पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मागील काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली होती.

मोदींनी या लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर हे ठिकाण जास्तच चर्चेत आले. त्यानंतर, मालदीवमधील काही नेत्यांनी मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यामुळे, भारत आणि मालदीवमध्ये सध्या तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत.

मालदीवमध्ये जाणारे अनेक भारतीय पर्यटक त्यांचे बुकिंग कॅन्सल करत आहेत. अनेक क्षेत्रांमधील व्यक्तींनी मालदीवचा निषेध व्यक्त करून लक्षद्वीपला जाणार असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे, ३६ बेटांचा समावेश असलेले हे सुंदर लक्षद्वीप अचानक चर्चेत आले आहे. जर तुम्ही देखील लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल, तर तिथे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या एंट्री परमिटबद्दल जाणून घेऊयात.

परमिटची आवश्यकता कुणाला आहे?

लक्षद्वीपमध्ये राहणारे मूळचे रहिवासी आणि तेथील ड्यूटीवर तैनात असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त इथे भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला परमिट एंट्रीची आवश्यकता आहे. भारतीय पर्यटक आणि विदेशी पर्यटकांना देखील हा नियम लागू आहे.

लक्षद्वीपमधील कोणत्या बेटांवर फिरण्याची परवानगी आहे?

लक्षद्वीपमधील सर्वच बेटांवर पर्यटकांना जाण्याची परवानगी नाही. या बेटावरील एकूण ५ बेटांवर जाण्याची भारतीय पर्यटकांना परवानगी आहे. या ५ बेटांमध्ये कावारत्ती, बंगाराम, अगत्ती, कदमत आणि मिनिकॉय या बेटांचा समावेश आहे.

परमिट एंट्रीसाठी अर्ज कसा करायचा?

लक्षद्वीपमधील परमिट एंट्रीसाटी तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता. एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आणि दुसरे म्हणजे ऑफलाईन पद्धतीने.

ऑनलाईन पद्धत

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई-परमिट पोर्टलला (https://epermit.utl.gov.in/pages/signup) भेट द्यावी लागेल. या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाऊंट काढावे लागेल आणि आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरावा लागेल. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्हाला तुमच्या ट्रीपच्या १५ दिवस आधी ई-मेलद्वारे हे परमिट मिळेल.

ऑफलाईन पद्धत

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला लक्षद्वीप प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर, त्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल, किंवा कावरत्ती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तो अर्ज घ्यावा लागेल.

त्यानंतर, हा अर्ज भरून तो जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावा लागणार आहे. ही प्रक्रिया जरा वेळखाऊ आहे, त्यामुळे, तुम्हाला परमिट मिळण्यास वेळ लागू शकतो.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

  • तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो

  • तुमच्या एका वैध ओळखपत्राची झेरॉक्स (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)

  • प्रवासाचा पुरावा (फ्लाईट तिकीट)

  • हॉटेल बुकिंगचा पुरावा (जर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहणार असाल तर)

परमिट शुल्क आणि वैधता

एंट्री परमिट हे साधारणपणे ३० दिवसांसाठी वैध असते. परमिट शुल्क हे तुमची राष्ट्रीयता आणि तुमच्या राहण्याच्या कालावधीनुसार वेगवेगळे असू शकते. त्यासाठी, तुम्ही ई-परमिटच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT