covid guidelines- Goa  esakal
टूरिझम

Omicron: गोव्याला फिरायला जात असाल, तर नव्या कोविड नियमांबद्दल जाणून घ्या

कोरोनाचं 'ओमिक्रॉन' हे नवं व्हेरियंट आढळल्याने संपूर्ण जगभरात खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Omicron: कोरोनाचं 'ओमिक्रॉन' हे नवं व्हेरियंट आढळल्याने संपूर्ण जगभरात खबरदारी घेतली जात आहे. भारतातही (India) ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाचे नियम कटाक्षाने पाळले जात आहेत. भारताने विमानतळांवरही (Airport) सुरक्षा कडक केली आहे. याचा परिणाम खासकरून पर्यटनावर होत आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्ही फिरायला गोव्याला (Goa) जाण्याची तयारी करत असाल, तर देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीची (Domestic or international travel) संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्यायला हवीत.

आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel)-

विमानतळावर आल्यावर APHO द्वारे थर्मल स्क्रीनिंग (thermal screening) केले जाईल. प्रवाशांना सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म (self declaration form) भरावा लागेल जो विमानतळ आरोग्य कर्मचाऱ्यांना ( health staff on Airport) दाखवावा लागेल. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (guidelines of the Ministry of Health) परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी (Covid test) आवश्यक आहे. युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायलसह उच्च-जोखीम असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त तपासणी करावी लागेल.

२. चाचणीत प्रवासी निगेटिव्ह (Covid negative) आढळल्यास त्यांना ७ दिवस घरी क्वारंटाईन (Quarantine) व्हावे लागेल. त्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा चाचणी होईल. जर ती पुन्हा निगेटिव्ह आली तर त्यांना ७ दिवस त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवावे लागेल.

3. चाचणीत एखादा प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला विलगीकरण सुविधेत नेले जाईल, जेथे त्याच्यावर प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील. तसेच या पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने 30 नोव्हेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुचित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जोखीम नसलेल्या देशांमधून येणार्‍या प्रवाशांची संबंधित एअरलाइन्सद्वारे ओळख पटवली जाईल आणि आगमन झाल्यावर विमानतळावर त्यांची चाचणी घेतली जाईल.

या चाचणीचा खर्च प्रवाशाला स्वत: भरावा लागणार आहे. जर हे प्रवासी कोविड पॉझिटिव्ह (Covid positive) आढळले तर त्यांचे प्रोटोकॉलनुसार व्यवस्थापन केले जाईल. 5 वर्षाखालील मुलांची प्रवासापूर्वी आणि नंतर चाचणी केली जाणार नाही. तथापि, जर त्यांच्यामध्ये कोविड-19 ची लक्षणे दिसली, तर त्यांची देखील चाचणी केली जाईल आणि प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध- आदित्य ठाकरे

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT