हिवाळ्यामध्ये ट्रेकिंग (Trekking) करण्यात वेगळीच मजा असते. जर तुम्ही या हिवाळ्यात (Winter) हिमाच्छादित टेकड्यांवर (Snow-capped hills) हायकिंग आणि ट्रेकिंगला (Hiking and trekking) जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य खबरदारी बाळगणे आणि योग्य तयारी करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कपड्यांपासून ते गियरपर्यंत अनेक गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत घ्यायला हव्यात. चला तर मग एक नजर टाकूया त्या चेकलिस्टवर जी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. (If you are going trekking in winter then go for these top 4 tips)
तुम्ही योग्य लेयरींगचे कपडे घालणे खूप महत्वाचे आहे, कारण तुमचे शरीर उबदार ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. जर तुमच्याकडे विविध प्रकारचे इन्सुलेटेड कपडे (Insulated clothing)असतील तर ते शरीराचे तापमान (Body temperature) सामान्य ठेवण्यास मदत होते आणि तुम्हाला आरामदायी वाटते. तसेच, बर्फात जातानाही तुम्ही दोन थरांचे हातमोजे घाला.
नेहमी लहान सुरुवात करा. सुरूवातीला जास्त अवघड ट्रेक (Trekking) करू नये. अंतर इतके जास्त नसावे की तुम्ही अस्वस्थ होऊ लागाल. उन्हाळ्यात (Summer) गोष्टी तशा सोप्या असतात परंतु हिवाळ्यात (Winter) परिस्थिती अधिक कठीण होते. सुर्योदय (Sunrise) आणि सुर्यास्ताच्या (Sunset) वेळा लक्षात असाव्यात. शक्यतो अंधारात ट्रेक करणं टाळा, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
ट्रेल मॅप (Trail Map), पॉकेट नाइफ (Pocket knife), हॅन्ड-वॉर्मिंग पॅकेट (Hand-Warming Packet), कंपास (Compass), बेसिक फर्स्ट एड किट (basic First Aid Kit)आणि हेडलॅम्प (Headlamps) सोबत ठेवा. तुम्ही निघण्यापूर्वी तुमचे हायकिंग गियर (Hiking Gear) जागेवर असले पाहिजे. जर तुम्ही ग्रुपमध्ये जात असाल तर हे गियर्स आपापसात वाटून घ्या जेणेकरून एकाच व्यक्तीने सर्व सामानाचा भार उचलू नये. तसेच, स्लीपिंग बॅग, पार्का, फोन, चार्जर आणि पॉवर बँक घेऊन जाण्यास विसरू नका.
हवामान हा ट्रेकिंगवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. ट्रेकिंगला जाण्यापूर्वी शक्यतो हवामानाचे भान ठेवा. खरंतर ही मुलभूत गोष्ट आहे, परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. वाऱ्याचा वेग, दिवस किती आहे यासारखी माहिती नक्कीच घ्या. हवामानाच्या परिस्थितीनुसार आपल्या सहलीचे नियोजन करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.