Ratnagiri Waterfalls esakal
टूरिझम

Ratnagiri Waterfalls : पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! धबधब्यांबाबत पोलिस दलानं केलं 'हे' आवाहन

धबधब्यात (Waterfalls) उतरणारे लोक वाहून जाणे अथवा गंभीर जखमी होण्याची भिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

अतिवृष्टीमुळे घाटामधील असणारी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा झाडांखाली आपली वाहने उभी करून ठेवणेदेखील टाळावे.

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाला सुरवात झाली आहे. अनेक पर्यटकांना (Tourists) धबधबे, समुद्र, धरण, नदी आदी ठिकाणी पोहण्याचा मोह होतो. जिल्ह्यामधील अनेक धबधब्यांमध्ये छोटे-मोठे दगड वाहून येतात.

धबधब्यांचा प्रवाह जास्त आहे. धबधब्यात (Waterfalls) उतरणारे लोक वाहून जाणे अथवा गंभीर जखमी होण्याची भिती आहे, अशा ठिकाणांना भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी. कोणत्याही ठिकाणी नियम व शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा लाभला आहे. त्या ठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, अनेक धबधबे, पाण्याचे डोह, घाट व घाटांमध्ये असणारे अनेक सनसेट पॉईंट्सवर भेट देण्यासाठी पर्यटक व नागरिक येत आहेत. जिल्ह्यामध्ये पावसाचे व वादळवाऱ्याचे प्रमाण अधिक आहे.

परिणामी, घाटामधील धुक्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याची दिसून येत आहे. काही दरडप्रवण क्षेत्रांमध्ये दरड कोसळण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे. परिणामी, वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

घाटांमधून प्रवास करणाऱ्या अथवा निसर्गप्रेमी लोकांनी घाटमाथ्यावर, अवजड वळणावर, सनसेट पॉईंट्सवर आपली वाहने उभी करून सेल्फी काढण्यासाठी थांबू नये. धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आपल्या वाहनाच्या फॉगलॅम्पचा व परावर्तकांचा योग्य वापर करावा.

अतिवृष्टीमुळे घाटामधील असणारी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा झाडांखाली आपली वाहने उभी करून ठेवणेदेखील टाळावे. अतिवृष्टीमुळे समुद्रामध्ये, धरण, पाणलोट क्षेत्र, नदी व नाल्यांमध्ये (पऱ्यांमध्ये) पोहण्याचा व तेथे भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजनांची काळजी घ्यावी. कोणत्याही ठिकाणी नियम व शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

-धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT