International Tiger Day 2024 esakal
टूरिझम

International Tiger Day 2024 : यंदाच्या वाघ दिनानिमित्त भारतातील 'या' सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांना नक्की द्या भेट

International Tiger Day 2024 : जगातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाघ हे केवळ एकट्या भारतात आढळतात.

Monika Lonkar –Kumbhar

International Tiger Day 2024 : जंगलाचा राजा म्हणून ‘वाघोबाला’ ओळखले जाते. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. जगभरात वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे, या प्राण्याचे योग्य संवर्धन करणे आणि त्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. वाघांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी जगभरात दरवर्षी २९ जुलै हा दिवस 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' म्हणून साजरा केला जातो.

हा दिवस भारतासाठी खूप खास आहे. कारण, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. जगातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाघ हे केवळ एकट्या भारतात आढळतात. त्यामुळे, भारतासाठी हा दिवस खास आहे. उद्याच्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आज आपण भारतातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांबद्दल (व्याघ्र अभयारण्य) जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच बनवू शकता. या ठिकाणांना भेट दिल्यावर तुम्हाला वाघ जवळून पाहता येतील.

पेंच व्याघ्र प्रकल्प

पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. हा व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात स्थित असून हा राज्यातील पहिला प्लॅस्टिकमुक्त व्याघ्र प्रकल्प आहे.

Pench Tiger Reserve

या पेंच अभयारण्याला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. या अभयारण्यात तुम्हाला वाघोबाचे दर्शन हमखास होणार यात काही शंकाच नाही. या ठिकाणी समृद्ध वन्यसंपदा, विविध प्रकारचे वन्यजीव, कीटक, प्राणी, पक्षी तुम्हाला पाहता येतील.

काझीरंगा व्याघ्र प्रकल्प

काझीरंगा व्याघ्र प्रकल्प हा भारतातील आसाम राज्यात स्थित आहे. विशेष म्हणजे या अभयारण्यात जगातील सर्वाधिक वाघ आहेत. आसाममधील वाघांची सर्वात मोठी संरक्षित लोकसंख्या काझीरंगा पार्कच्या तेराई-सवान्ना प्रदेशात आढळते.

काझीरंगा व्याघ्र प्रकल्प

या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाघ, हत्ती, वनगाय, जंगली म्हैस आणि एकशिंगी गेंडे देखील आढळतात. महत्वाची बाब म्हणजे या राष्ट्रीय उद्यानाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. २००७ मध्ये या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.

कान्हा राष्ट्रीय उद्यान

कन्हा राष्ट्रीय उद्यानाला 'कान्हा व्याघ्र प्रकल्प' म्हणून ही ओळखले जाते. आशिया खंडातील सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांपैकी एक म्हणून या अभयारण्याला ओळखले जाते. भारतातील प्रसिद्ध बंगाल वाघांचे हे निवासस्थान आहे.

kanha national park

या उद्यानात आल्यावर तुम्हाला भारतीय हत्ती, अस्वल, वाघ यांच्यासोबत इतर प्राणी, पक्षी ही पहायला मिळतात. महत्वाची बाब म्हणजे या उद्यानात जगातील ६ हजार वाघांपैकी ५०० वाघ आहेत.

जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प

उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध अभयारण्य म्हणून या जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला ओळखले जाते. हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प असून तो हिमालयाच्या पायथ्याशी स्थित आहे.

Jim Corbett National Park

या प्रकल्पाला भेट दिल्यावर तुम्हाला हत्ती सफारी करता येईल. या ठिकाणी बंगाल वाघांव्यतिरिक्त भिन्न प्रजातींचे ५८५ पक्षी आणि ७ उभयचर प्रजाती पाहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT