जम्मू : जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध तिर्थस्थळ वैष्णोदेवी मंदीर यात्रा आणखी सोपी होणार आहे. मंदीराच्या विश्वस्त मंडळाने आल्या ६९ व्या बैठकीत १२०० मीटर लांबीचा रोपवे मार्ग बनवण्यासाठी मंजूरी दिली आहे. लवकरच या मार्गाचं काम सुरु होणार असून साधारण दोन वर्षात या मार्गाचं काम होणार असल्याचं बोललं जातंय.
देशभरातून भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येत असतात. या यात्रेसाठी भाविकांना डोंगर चढून देवीच्या मंदीरापर्यंत पोहोचावं लागतं. त्यासाठी भाविकांना खूप त्रास होतो. यामुळे मंदिराच्या विश्वस्त मंडळाने हा मार्ग बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान प्रस्तावानुसार हा मार्ग कटरा ते अर्धकुमारी यादरम्यान होणार आहे. या मार्गावरील कामासाठी मंजूरी मिळाली आहे. प्रस्वावानुसार हा मार्ग १२८१ मीटरचा असून जमीनीपासून या मार्गाची उंची ही ५९० मीटर असणार आहे.
हा मार्ग दोन वर्षात पूर्ण होणार आहे. या सगळ्या कामासाठी ९४.२३ कोटी रुपये खर्च होणार आहे. पुनर्गठीत केलेल्या मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पाच वर्षापूर्वी घेण्यात आला होता पण काही कारणास्तव हा प्रस्ताव मंजूर झाला नव्हता. २०१७ मध्ये या कामाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या रोपवेच्या आधारे एका वेळेस १५०० प्रवाश्यांना प्रवास करता येणार आहे. एका केबिनमध्ये आठ प्रवाश्यांना प्रवास करता येणार आहे. एका प्रवाश्याला हा प्रवास करण्यासाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. अर्धकुमारी पासून भवन पर्यंत वीजेवर चालणारे वाहन चालतात त्याव्यतिरिक्त कटरापासून अर्धकुमारीपर्यंत वाहने जात नसल्याने प्रवाशांना त्रास होत होता. रोपवे मार्ग झाल्यावर प्रवाश्यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.