Kaas Plateau Flowering Season esakal
टूरिझम

Kaas Pathar : कास पठारावरील फुलांचा बहर ओसरला...; 'या' तारखेपासून Online Booking होणार बंद

Kaas Plateau Flowering Season : महिनाभरात लाखो पर्यटकांनी (Tourists) कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला.

सकाळ डिजिटल टीम

कुमुदिनी तलावामध्ये मात्र आजही पांढरी कुमुदिनीची फुले मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. संपूर्ण तलाव पांढऱ्या शुभ्र कमळांनी बहरला आहे.

कास : महिनाभरापासून सुरू असलेला कासवरील (Kaas Plateau) फुलांचा बहर ओसरला असल्‍याने पठारावरील रंगोत्सवात फरक दिसू लागला आहे. पठारावरील बहुतांश फुलांनी यावर्षीसाठी निरोप घेतला असून, काही दुर्मिळ प्रजातींच्‍या फुलांसह मिकी माऊसची पिवळी छटा काही ठिकाणी पाहायला मिळत आहे.

यावर्षी पाच सप्टेंबरला हंगामाचा नारळ फुटला होता. महिनाभरात लाखो पर्यटकांनी (Tourists) कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला. यावर्षी चांगला पाऊस, अधूनमधून पडणारे ऊन यामुळे फुलांचे गालिचे पठारावर पाहायला मिळाले. विशेषतः सात वर्षांतून एकदाच फुलणारी टोपली कारवी यावर्षी मोठ्या प्रमाणात फुलली होती. पठारावर निळे गालिचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. गतवर्षी पठाराला असणारी लोखंडी कुंपण काढल्यापासून फुलांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी पठारावर जुना बहर अनुभवावयास आला.

कुमुदिनी तलावामध्ये मात्र आजही पांढरी कुमुदिनीची फुले मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. संपूर्ण तलाव पांढऱ्या शुभ्र कमळांनी बहरला आहे. त्यामुळे राजमार्गावर असलेल्या या तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांच्या रांगाच रांगा पाहावयास मिळाल्या. घाटाई फाट्यावरील वाहनतळ तसेच कास तलावाच्या वरील बाजूचा वाहनतळ वाहनांनी भरून गेला होता. यावर्षी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवली असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. हंगामातील बहुदा हा शेवटचाच विकेंड असल्याने लोकांची मोठी गर्दी आज पाहायला मिळाली.

कास पठारावरील फुलांचा बहर कमी झाल्याने कास समितीमार्फत सुरू असलेले ऑनलाइन बुकिंग पंधरा ऑक्टोबरनंतर बंद करण्यात येणार आहे. थेट येणाऱ्या लोकांना प्रवेश देण्यात येईल. फुलांची परिस्थिती पाहून हंगाम समाप्‍तीचा निर्णय घेतला जाईल.

-दत्ता किर्दत, अध्यक्ष, कास पठार व्‍यवस्‍थापन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT