know about this beautiful town bundi of Rajasthan Marathi Article 
टूरिझम

बुंदी, राजस्थानच्या या सुंदर शहराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर राजस्थान हे भारतातील बेस्ट राज्य आहे. जयपूर, उदयपूर, जैसलमेर, पुष्कर, अजमेर, राजस्थान अशी काही शहरे आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले असेल किंवा भेट दिली असेल, पण तुम्हाला बुंदी शहराबद्दल माहिती आहे काय?   राजस्थानच्या या शहराचे हवामान कायम चांगले राहते, सोबतच इथले  लोक मनमिळावू तर आहेतच सोबतच या शहरात खाद्य पदार्थांची रेलचेल आहे. येथे तुम्ही बुंदीच्या हेरिटेज हॉटेलमध्ये राहू शकता आणि या शहराचा मनसोक्त आनंद घेऊ शकत. आज आपण याच बूंदी शहराबद्दल जाणून घेणार आहोत. 

रानीजी की बाओली

बुंदीच्या राणी नाथावती जी यांनी सन 1699 मध्ये ही सुंदर बाओली बांधली. राव राजा अनिरुद्ध सिंह यांनी पहिल्या पत्नीसह बूंदीवर राज्य केले होते.  राजा अनिरुद्ध सिंगने आपला उत्तराधिकारी मिळण्याच्या इच्छेने राजकुमारी नाथावतीजींशी लग्न केले कारण त्यांची पहिली पत्नी त्यांना वारसदार देऊ शकत नव्हती. लग्नानंतर, राणी नाथावती जी यांनी एका मुलाला जन्म दिला, जो पहिल्या राणीकडे देण्यात आला. ज्यामुळे राणी नाथावती जी मनापासून दु: खी झाली. आपल्या मुलापासून दूर राहण्याचे त्यांना फार वाईट वाटले, म्हणून त्याने आपले लक्ष इतर कामांमध्ये घालण्यास केंद्रित केले आणि बाओली इत्यादी गोष्टी बनवल्या. 

इथले तलाव तुम्हाला नक्की आवडतील

बुंडीच्या राजांनी जवळपासच वसलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी हे तलाव बांधले. नवल सागर हा जुन्या शहरातील मुख्य तलाव आहे आणि तेथे वरुण देवाचे अंशतः पाण्यात बुडालेले मंदिर आहे. तुम्ही संध्याकाळी तलावाच्या बाजूने फेरफटका मारु शकता आणि सुंदर फोटो देखील काढू शकता. 

जैत सागर हे बुंदीपासून थोड्या अंतरावर असलेले आणखी एक पर्यटन स्थळ आहे. आजूबाजूला छोटी मंदिरे आणि नयनरम्य अरवली देखील आहे. हा तलाव पाहण्यासाठी  एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ उत्तम आहे या काळात इथे सुंदर कमळांची फुले फुलतात.

महलांमध्ये केलेली लघु चित्रे पाहा

अनेक दशकांपूर्वी हाडा राजपूतांनी बनवलेल्या भित्ती चित्रे पाहण्यासाठी आपल्या बुंदीच्या बूंदी महालला भेट देण्याचा प्लॅन नक्की करा. हाडोती स्कूल ऑफ पेंटिंगची स्थापना १७ व्या ते १ ९ व्या शतकात हाडाच्या महाराजांनी केली होती. या शाही शैलीच्या राजस्थानी सूक्ष्म चित्रांच्या विशिष्ट शैलीमुळे बुंदीला भारताच्या इतिहासात एक विशेष स्थान मिळाले आहे.

स्थानिक मातीच्या भांड्यांसाठी खेड्यांना भेट द्या

बुंदीच्या उत्तरेकडील भागात अकोदा आणि थिकर्दा अशी दोन गावे आहेत जिथे भांडी माती व पाण्यापासून बनविली जातात. अकोदा हे थिकर्दापेक्षा एक मोठे आणि अधिक प्रसिद्ध गाव आहे. पण दोन्ही गावात तुमचे मनापासून स्वागत होईल. कुंभार तेथील पर्यटकांना आपली सुंदर भांडी दाखवतात, परंतु सविस्तर फेरफटका मारायचा असेल तर पैसे लागू शकतात. येथील पारंपारिक घरेही पाहण्यासारखी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: पैसे कमवण्याची मोठी संधी; आज इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कोणते शेअर्स असतील तेजीत?

Mumbai Indians Retention : रोहित कुठे जात नाहीए! मुंबई इंडियन्स Rohit Sharma ला रिटेन करणार, ४ खेळाडूंची नावं जवळपास निश्चित

Share Market Opening: शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 200 अंकांनी वाढला, निफ्टी 25,000च्या पातळीवर, ऑटो शेअर्स घसरले

Hingana Assembly Election 2024: हिंगणा विधानसभा जातीय समीकरणाला आर्थिकपणाचा छेद

IND vs NZ 1st Test : टीम इंडियाने टॉस जिंकला, Shubman Gill सामन्याला मुकला; Playing XI मध्ये आक्रमक फलंदाज परतला

SCROLL FOR NEXT