टूरिझम

मुंबईजवळ असलेले सुंदर हिल स्टेशन्स, तर मग आत्ताच करा ट्रिप प्लान

विवेक मेतकर

अकोला: आपल्याला शहराच्या बाहेर एखाद्या साहसी ट्रेकवर (Adventure trek) जायचे असेल किंवा निर्सगाच्या सहवासात काही काळ शांतपणे घालवायचा असेल तर आम्ही तुम्हाला अशाच पर्यटन स्थळाबद्दल (Tourist destination) सांगणार आहोत. पुणे- मुंबई (Pune-Mumbai) जवळ असल्याने वीकएंडला (Weekend) रोजच्या घाईगर्दीतून थोडा वेळ बाजूला काढून पर्यटकांची पावले लोणावळयाकडे वळल्याशिवाय राहत नाहीतच. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध असा हा परिसर आहे. (know-these-famous-hill-stations-near-mumbai)

येथून दोन किलोमीटरवर कैवल्यधाम हा योगाश्रम आहे. येथे योगिक उपचारांसोबतच संशोधन व योग प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. लोणावळयानजीक मळवलीवरुन कार्ले व भाजे लेणी अगदी पाच दहा किलोमीटर अंतरावर आहेत. येथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. लोणावळयापासून पाच किलोमीटर अंतरावर मळवली या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोणा व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहेत.

लोणावळा

विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटतं. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यास खूप मजा येते.

खंडाळा

कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे ठिकाण म्हणजे खंडाळा. मुंबई,पुणे व इतर जवळच्या शहरातील तरुण पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येऊन पिकनिकचा आनंद लुटतात. ड्यूक्स नोज हे येथे एक जवळचे डोंगर शिखर आहे. या जागेवरून पर्यटकांना खंडाळ्याचा आणि बोर घाटाचा मनोवेधक नैसर्गिक सृष्टि सौंदर्याचा देखावा नजरेत सामावता येतो. येथे टायगर लीप (वाघदरी), अमृतांजन पॉईंट, कार्ला असं बरंच काही पर्यटनासाठी आहे.

माथेरान

माथेरानला रेल्वे किंवा बस अशा दोन्ही मार्गांनी जाता येते. रेल्वेने जायचे असल्यास मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील नेरळ या स्थानकावर उतरून तेथून माथेरानपर्यंत छोटेखानी मीटरगेज रेल्वेने जावे लागते. हा प्रवास अतिशय सुखद असतो. घाटात वळणं घेत जाणाऱ्या या गाडीतून बाहेरची निसर्गदृष्ये पाहताना मन थक्क होतं.

पाचगणी

पाचगणी

पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. पाचगणीच्या विकासाला महाबळेश्वर हेच मुख्यतः कारणीभूत असले तरीही पाचगणीचं स्वतः असं वैशिष्ट्य आहेच. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं वैशिष्ठ्य आहे. पाहताना काळजाचा ठोका चुकविणाऱ्या खोल दऱ्या, धबधबे, कमलगड किल्ला, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रेक्षणीय स्थळं आवर्जून पाहावी अशी आहेत.

महाबळेश्वर

सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉईंटस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडनिग पॉईंट हे त्यापैकी प्रसिध्द डोंगरकडे होत. येथील स्ट्रॉबेरीज, रासबेरीज, लाल रंगाचे मुळे प्रसिध्द आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिध्द आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.

चिखलदरा

अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वंतरांगेत 'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते. चिखलदरा या ठिकाणाला मनोरंजक इतिहास आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पार महाभारतात जावे लागते. पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता, असे म्हणतात. भीमाने येथील राजा कीचकचा वध करून एका दरीत फेकून दिला होता. ती दरी म्हणजेच कीचकदरी होय. परंतु, कालांतराने कीचकनरीचे रूपांतर चिखलदरीत झाले व चिखलदरीचे चिखलदर्‍यात. चि‍खलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भात सर्वाधिक ऊन असते. निसर्गाची शितलता अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. चिखलदरा येथील हजारो फूट खोल दर्‍या या पर्यटकांना काही काळ श्वास रोखण्यास लावतात. दरीच्या वरच्या भागात एक कुंड आहे. या कुंडात भीमाने अंघोळ केली होती, त्यामुळे या कुंडाला भीमकुंड असे नाव पडले आहे. असे म्हणतात.

सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण येते. मेळघाट परिसर हा 'व्याघ्रप्रकल्प' म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे चिखलदर्‍याच्या घाटात वाघोबाचे दर्शन घडू शकते. मोर, रानकोंबड्या, अस्वले, हरीन तर मुक्त संचार करतात.

संपादन - विवेक मेतकर

(know-these-famous-hill-stations-near-mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT