Pregnancy Tourism  esakal
टूरिझम

Ladakh Tourism : भारतातील या खेडेगावात युरोपियन तरुणी गर्भवती होण्यासाठी येतात, काय आहे कारण ?

Ladakh Tourism : में तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ! असा डायलॉग परदेशी महिला भारतातल्या या गावातील पुरूषांना आवडीने म्हणायच्या, पण का?

सकाळ डिजिटल टीम

Ladakh Pregnancy Tourism :

प्रत्येक जोडप्याला वाटत असतं की त्यांना जन्माला येणारा बाळ हे निरोगी असावं. त्यासाठी गर्भधारणा झाल्यापासून योग्य ती काळजी घेतली जाते. प्रत्येक पालकाच्या अशापेक्षा सुद्धा असते की आपला बाळ सुंदर असाव. मुलाचं दिसणं त्याच्या पालकांवर अवलंबून असतं. तरीही काही पालक वेगवेगळ्या युक्त्या करत असतात.

गर्भवती मातेने केशर जास्त प्रमाणात खाल्ले तर बाळ सुंदर होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रेग्नेंसी काळात अनेक महिला केशर खात असतात. शेवटी जसे आई-वडील तसेच मुलंही होणार. पण तरीही पालक काही प्रयत्न नक्कीच करत असतो.

आर्यन व्हॅली गावातील स्त्रिया

अनेक महिलांना गर्भवती असताना प्रवास करू नका असं सांगितलं जातं. तर काही महिलांना गर्भवती असताना फिरण्याचे डोहाळे लागलेले असतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या काळात जास्त प्रवास करणे टाळावे. पण आपल्या भारतात एक असं पर्यटनाचा पर्याय उपलब्ध आहे जो ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का असेल.

आपल्या भारतात असं एक ठिकाण आहे जिथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात. होय हे खरं आहे, याला प्रेग्नेंसी टुरिझम असं म्हटलं जातं. ते ठिकाण कोणतं आणि तिथे परदेशी महिला येऊन गर्भवती होण्याची इच्छा का व्यक्त करतात याबद्दल अधिक माहिती घेऊयात.

अल जझीरा, ब्राउन हिस्ट्री आणि कर्ली टेल्स या इंग्रजी वृत्तवाहिन्यांच्या मते, लडाखची राजधानी लेहपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर बियामा, दाह, हनु, गारकोन, दारचिक नावाची काही गावे आहेत. जेथे सुमारे 5,000 लोक राहतात. लडाखच्या या भागात राहणारा हा एक खास समुदाय आहे. त्यांचे नाव ब्रोक्पा समुदाय आहे.

ब्रोक्पा लोकांचा दावा आहे की ते जगात राहिलेले शेवटचे शुद्ध आर्य आहेत. म्हणजे त्याचे रक्त आर्यन आहे. पूर्वी इंडो-इराणी वंशाच्या लोकांना आर्य म्हटले जात असे, परंतु नंतर इंडो-युरोपियन वंशाच्या लोकांना आर्य म्हटले जाऊ लागले.

असे मानले जाते की, हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्यात सैनिक होते. अलेक्झांडर भारतात आला तेव्हा त्याच्या सैन्यातील काही सैनिक सिंधू खोऱ्यात राहिले. ह्यांना मास्टर रेस असेही म्हणतात. लडाखच्या इतर लोकांप्रमाणे त्यांची रचनाही वेगळी आहे.

ते मंगोल आणि तिबेटी लोकांसारखे दिसत नाहीत. ते उंच, गोरा रंग, लांब केस, वाढलेले जबडे आणि हलक्या रंगाचे डोळे आहेत. यामुळे हे लोक दिसायला सुंदर असतात. ते जिथे राहतात ते ठिकाणही खूप सुंदर आहे.

लदाखमधील निसर्गसौंदर्यानं भरलेली गावं

संशोधन काय म्हणते..

आजपर्यंत या समाजातील लोक शुद्ध आर्य आहेत, असे कोणतेही संशोधन झालेले नाही, त्यांची कोणतीही डीएनए चाचणी झालेली नाही . असे असतानाही जर्मनीसह युरोपातील इतर देशांतून महिला येथे येत आहेत.

इथं जन्मलेलं बाळ शुद्ध आर्य वंशाचं होतं

या महिला या गावांमध्ये येतात कारण त्यांना त्यांचे बाळ शुद्ध आर्य वंशाचं असावे असे वाटते. येथे याच कारणासाठी येतात की त्यांना शुद्ध आर्य बीज मिळावे जेणेकरून त्यांच्या मुलांचे स्वरूप त्या लोकांसारखेच असेल. या कारणास्तव या ठिकाणी युरोपियन महिला यायच्या. याला प्रेग्नंसी टुरिझम असे नाव देण्यात आले.

‘अचतुंग बेबी: इन सर्च ऑफ प्युरिटी’ डॉक्युमेंट्री

2007 मध्ये, ‘अचतुंग बेबी: इन सर्च ऑफ प्युरिटी’ नावाचा एक डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली होती. जो चित्रपट निर्माते संजीव सिवन यांनी बनवला होता. त्या डॉक्युमेंटरीमध्ये एका जर्मन महिलेने आपण लडाखमध्ये शुद्ध आर्य बीजाच्या शोधात आल्याचे सांगितले होते.

एका अधिकाऱ्याच्या मदतीने या महिलेने लदाखमधील गावातील एका व्यक्तीशी मैत्री केली. त्या काळात ती त्याच्यासोबत उघडपणे फिरू शकली नाही. मात्र, हॉटेलमध्ये काहीवेळ तिने त्याच्यासोबत घालवला. जेव्हा ती महिला गर्भवती राहिली तेव्हा ती मायदेशी परतली. त्यानंतर, तिने एका बाळाला जन्म दिला आणि ती पुन्हा त्याला पित्याला भेटवण्यासाठी आली.

ग्रामस्थांचा पारंपरिक पोषाख

या महिलेने केवळ स्वत:चा फायदा करून घेतला असं नाही. तर त्या तिने संबंधित पुरूषाला आर्थिक मदतही केली. तसेच, त्याच्या कुटुंबासाठीही लागणाऱ्या गोष्टी, पैसे देऊ केले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT