New Year 2024 esakal
टूरिझम

2024 long weekend : नवीन वर्षात असणार भरगच्च लाँग विकेंड्स, आतापासूनच करा फिरायला जाण्याचे प्लॅनिंग

Monika Lonkar –Kumbhar

New Year 2024 : आपण सर्वजण आता नवीन वर्षाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत. २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आपण सर्वजण आहोत. त्यामुळे, अवघ्या काही दिवसांनी आपण २०२३ ला निरोप देणार आहोत आणि २०२४ मध्ये नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत.

ज्या लोकांना फिरण्याची आवड आहे. ते लोक २५ डिसेंबरला ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की येत्या नव्या वर्षात तुम्हाला फिरायला जाण्याची भरपूर संधी मिळणार आहे.

कारण, येत्या वर्षात भरपूर लॉंग विकेंड्स येणार आहेत. त्यामुळे, तुम्ही या लॉंग विकेंडस्ला मस्त फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आजच्या आर्टिकलमध्ये आपण पुढील वर्षातील लॉंग विकेंड्सच्या तारखांबद्दल जाणून घेणार आहोत. या तारखा जाणून घेऊन तुम्ही त्या प्रमाणे तुमच्या सुट्ट्या प्लॅन करून लॉंग विकेंड एंजॉय करू शकता.

जानेवारी महिन्यातील लाँग विकेंड

जानेवारी महिन्यात काहींना १ जानेवारी अर्थात वर्षाच्या पहिल्या दिवशी सुट्टी असते. त्यादिवशी आणि १५ जानेवारीला या दोन्ही दिवशी तुम्ही वनडे पिकनिकला जाऊ शकता. त्यानंतर, २६ जानेवारी ते २८ जानेवारीला लॉंग विकेंड आहे, या विकेंडला तुम्ही ३-४ दिवस फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

  • १ जानेवारी (सोमवार)

  • १५ जानेवारी (मकरसंक्रांती)

  • २६-२८ (२६ जानेवारी-२८ जानेवारी) लॉंग विकेंड 

(Long weekend in January)

मार्चमधील लाँग विकेंड

मार्च महिन्यात ८ मार्चला शुक्रवारी महाशिवरात्री आहे. त्या महाशिवरात्रीपासून ते रविवारपर्यंत २ दिवसांचा विकेंड आहे. त्यानंतर, २३ मार्च ते २५ मार्चला होळीला पुन्हा २ दिवसांचा विकेंड आहे. त्यानंतर, २९ मार्च ते ३१ मार्च पुन्हा ३ दिवसांचा लॉंग विकेंड आहे.

  • ८ मार्च (शुक्रवारी महाशिवरात्री) ते १० मार्च (रविवार)

  • २३ मार्च (शनिवार) ते २५ मार्च (होळी, रविवार)

  • २९ मार्च (गुड फ्रायडे) ते ३१ मार्च (रविवार इस्टर संडे)

(Long weekend in March)

मे महिन्यातील लाँग विकेंड

मे महिन्यात तुम्ही ३ दिवसांचा लॉंग विकेंड एंजॉय करू शकता. यासाठी २३ मे (गुरूवार) ते २५ मेला एक सुट्टी घेऊन तुम्ही २६ मे (रविवार) पर्यंत लॉंग विकेंडला फिरायला जाऊ शकता.

(May long weekend)

जून महिन्यातील लाँग विकेंड

जून महिन्यामध्ये १५ जून (शनिवार) ते १७ जून (सोमवार,बकरीईद) पर्यंत तुम्ही २ दिवसांचा विकेंड एंजॉय करू शकता. (June long weekend)

ऑगस्टमधील लाँग विकेंड

ऑगस्ट महिन्यात तुम्ही १५ ऑगस्ट (गुरूवार) ते १९ ऑगस्ट (रक्षाबंधन, सोमवार) पर्यंत ५ दिवसांचा लॉंग विकेंड एंजॉय करू शकता. फक्त शुक्रवारी १६ ऑगस्टला तुम्हाला एक दिवस सुट्टी घ्यावी लागेल. (Long weekend in August)

२४ ऑगस्ट (शनिवार) ते २६ ऑगस्ट (सोमवार, जन्माष्टमी) या ३ दिवसांच्या लॉंग विकेंडला तुम्ही एखादी छान ट्रीप प्लॅन करू शकता.

सप्टेंबर महिन्यातील लाँग विकेंड

५ सप्टेंबर (ओणम, गुरूवारी) ते ८ सप्टेंबर (रविवारी) या ४ दिवसांच्या लॉंग विकेंडला तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. (Long weekend in September)

ऑक्टोबर लाँग विकेंड

ऑक्टोबर महिन्यात ११ ऑक्टोबर (महानवमी, शुक्रवार) १२ ऑक्टोबर (शनिवार दसरा) आणि १३ ऑक्टोबर (रविवार) या ३ दिवसांच्या लॉंग विकेंडला तुम्ही एखादी छोटीशी ट्रीप प्लॅन करू शकता. (October Long Weekend)

नोव्हेंबर महिन्यातील लाँग विकेंड

नोव्हेंबर महिन्यात तुम्ही १ नोव्हेंबर (शुक्रवारी, दिवाळी) २ नोव्हेंबर (शनिवार) ३ नोव्हेंबर (भाऊबीज, रविवार) हा ३ दिवसांचा लॉंग विकेंड तुम्ही एंजॉय करू शकता. (Long weekend in the month of November)

डिसेंबर

डिसेंबर महिन्यात कोणतीही सुट्टी नाही. मात्र, २६ आणि २७ डिसेंबरला २ दिवसांची सुट्टी घेऊन तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंतचा लॉंग विकेंड एंजॉय करू शकता. (Weekends for December)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Seema Deo: सुनेसोबत अशा वागायच्या सीमा देव; सासूबाईंबद्दल बोलताना स्मिता देव म्हणाल्या- त्या घरी असल्या की..

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याने जेष्ठ नागरिकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT