Mahashivratri 2024  esakal
टूरिझम

Mahashivratri 2024 : देशातील ‘या’ ठिकाणी आहेत महादेवाच्या सर्वात मोठ्या मूर्ती, महाशिवरात्रीनिमित्त एकदा नक्की द्या भेट

Mahashivratri 2024 : यंदा ८ मार्चला महाशिवरात्री देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दिवशी असंख्य भाविक महादेवांच्या मंदिरांना भेट देतात.

Monika Lonkar –Kumbhar

Mahashivratri 2024 : अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री (mahashivratri) येऊन ठेपली आहे. यंदा ८ मार्चला महाशिवरात्री देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महादेवांचे असंख्य भाविक महाशिवरात्रीनिमित्त व्रत करतात. या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, असे मानले जाते. त्यामुळे, महाशिवरात्रीला अतिशय महत्व आहे.

महाशिवरात्रीला असंख्य भाविक देशभरातील शंभू महादेवांच्या विविध मंदिरांना भेट देतात. मंदिरांमध्ये जाऊन भोलेनाथांचे दर्शन घेतात. जर यंदाच्या महाशिवरात्रीला तुम्ही देशभरातील महादेवांच्या मंदिरांमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. आज आम्ही तुम्हाला देशातील महादेवांच्या सर्वात मोठ्या मूर्ती असलेल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात त्या ठिकाणांबद्दल.

आदियोगी शिव प्रतिमा

तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूरमध्ये स्थित असलेली भगवान शंकराची ही भव्य आदियोगी स्वरूपातील मूर्ती सर्वांना माहित आहे. सोशल मीडियावर तुम्ही या आदियोगी मूर्तीचे विविध फोटो आणि व्हिडिओ पाहिले असतील. या भव्य दिव्य मूर्तीचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

महादेवांच्या चेहऱ्याच्या आकारात असलेली ही शिवाची एकमेव मूर्ती आहे. या भव्य मूर्तीची उंची ११२ फूट असून वजन सुमारे ५०० टन आहे. या मूर्तीचे बांधकाम २४ फेब्रुवारी २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आले. या ठिकाणी देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देत असतात. यंदाच्या महाशिवरात्रीला तुम्ही देखील या ठिकाणी नक्की भेट द्या. (Adiyogi Shiva Temple)

कैलाशनाथ महादेव प्रतिमा

कैलाशनाथ महादेवाची ही मूर्ती भारतीय सीमेजवळील सांगा (नेपाळमधील गाव) या गावी आहे. या मूर्तीचा रंग सोनेरी आहे. ही मूर्ती नेपाळमधील सांगामध्ये स्थित आहे. येथील मंदिराला कैलाशनाथ महादेव मंदिर असे ही म्हटले जाते.

महादेवाच्या या भव्य मूर्तीची उंची ४५ मीटर म्हणजेच जवळपास १४३ फूट उंच आहे. महादेवाचा हा पुतळा नेपाळमधुनही पाहता येतो. (Kailashnath Mahadev)

हरिद्वार येथील महादेवाची मूर्ती

उत्तराखंड या राज्यातील प्रसिद्ध हरिद्वार या शहरात महादेवाची ही भव्य मूर्ती स्थित आहे. हर की पौडीच्या गंगा घाटावर भगवान शिवाची ही भव्य मूर्ती विराजमान आहे. तब्बल १०० फूट उंच असलेली ही भव्य मूर्ती पाहण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतात.

लांबूनही या मूर्तीचे दर्शन होते. देशातील भगवान शंकराची भव्य मूर्ती म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. (Mahadev Statue Haridwar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT