Nymphoides Indicum esakal
टूरिझम

कास पठार : फुलांच्या जीवनमानात मोठा बदल

सूर्यकांत पवार

कास (सातारा) : वाचून आश्चर्य वाटेल, पण जागतिक वारसा स्थळ असलेल्या व जैवविविधतेचे आगार असलेल्या कास पठाराच्या (Kas Plateau) फुलांच्या जीवनमानात बदल होत असून चक्क ऑक्टोबरमध्ये येणारी फुलं ऑगस्टमध्ये आली असून यावर्षी पठारावर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये गेंद, सीतेची आसव इत्यादी फुलं ही अद्याप फुललेली नाहीत. त्यामुळे कासच्या फुलांच्या जीवनमानात काही बदल होतोय का? याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे.

कास पठार ते राजमार्ग या रस्त्याच्या उजव्या बाजूला अडीच हेक्टर परिसरात कुमुदिनी तलाव पसरलेला आहे.

कास पठार ते राजमार्ग या रस्त्याच्या उजव्या बाजूला अडीच हेक्टर परिसरात कुमुदिनी तलाव (Kumudini Lake) पसरलेला आहे. या तलावामध्ये कुमुदिनी (Nymphoides Indicum) ही पृष्ठभागावर आढळते, तर पाण्याच्या तळाला रोटाला ही वनस्पती आढळते. कुमुदिनी तलावाला सरोवर तलावही म्हटले जाते. या वर्षी कासच्या वातावरणात काय बदल झाला काय माहित, पण या कुमुदिनी तलावातील ऑक्टोबरमध्ये येणारी फुलं चक्क ऑगस्टमध्ये आली आहेत. पहिल्यांदाच हा बदल घडला असून याबाबत स्थानिक संशोधक ही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Kumudini Lake

पावसाळा आला की, ही वनस्पती जीवंत होते

या तलावामध्ये पानभोपळी नावाची वनस्पती आढळते. यालाच कुमुदिनी किंवा छोटे कमळ असे म्हटले जाते. याची पाने पाण्यावर तरंगतात. त्याच्यावर पांढरी केसरयुक्त फुले येतात. याची मुळे पाण्यातून माती भागापर्यंत अन्न शोषण्यासाठी तरंगतात. उन्हाळ्यात पाणी आटून गेल्यावर मुळ्या व कंद जमिनीमध्ये सुकून जातात. पुनः पावसाळा आला की, ही वनस्पती जीवंत होते. संपूर्ण तलावावर ही वनस्पती पसरलेली आहे. या वनस्पतीच्या जाळीतून तलावातील पाणीपण दिसत नाही. कुमुदिनीला बहर आल्यावर संपूर्ण तलाव पांढराशुभ्र दिसतो. जणू काही तलावावर पांढऱ्या कमळांची चादर चढवल्याचा आभास तयार होतो.

Kumudini Lake

फुलांच्या जीवनक्रमात बदल होणं धक्कादायक

अत्यंत दुर्मिळ असणारी ही फुले पाहण्याचा वेगळाच आनंद मिळतो. पण, ऑगस्टमध्ये कुमुदिनी तलावातील फुले फुलल्याने नक्की ही घटना फुलांसाठी चांगली आहे की, नुकसानदायक हे नंतरच कळणार आहे. कासचा हंगाम पंचवीस ऑगस्टपासून चालू झाला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतसाली बंद असणारा हंगाम यावर्षी चालू झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पर्यटक चांगली गर्दी पठारावर करत आहेत. कास पठार कार्यकारी समितीमार्फत हंगामाचे नियोजन चांगले झाले असून पर्यटक फुलांचा आनंद घेताना दिसत आहेत.

Nymphoides Indicum

निसर्गात काहीतरी बदल होतोय. कासच्या फुलांचा जीवनक्रमात बदल होणे धक्कादायक आहे. पठारावर फुलांचे प्रमाणही कमी दिसत आहे. हा बदल सकारात्मक आहे, की नुकसानदायक हे येणारा काळच ठरवेल.

-श्रीरंग शिंदे, निवृत्त वनपाल बामणोली

Kas Plateau

ऊन-पावसाचा खेळ सुरु असतो. याचा हा परिपाक आहे. गेल्यावर्षी माणसांचा व चरणाऱ्या प्राण्यांचा वावर कमी होता. त्यामुळे फरक दिसू शकतो. पण, त्यावर आत्ताच बोलणं योग्य नाही. त्यासाठी चार-पाच वर्षे निरीक्षण करावं लागेल. गेल्या चार-पाच वर्षांत खूप उकडतंय आणि नंतर पाऊस पडतोय. सध्या पाऊस पण वाढला आहे. तापमान ही दोन डिग्रीने वाढले आहे. कास पठार हे अतिसंवेदनशील अधिवास असलेलं क्षेत्र आहे. झाडे, वनस्पती व कीटक यांचा अधिवास असल्याने याच्यावर परिणाम होत आहे, हे मात्र नक्की!

-डाॅ. संदीप श्रोत्री, अभ्यासक कास पठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT