टूरिझम

भारतातील ही 10 ठिकाणे, जी तुम्हाला करणार आश्चर्यचकित !

भारतात बर्‍याच जागा आहेत ज्या परदेशी देशांशी अगदी जुळतात.

भूषण श्रीखंडे

जळगाव ः परदेशात मजा करण्यासाठी तसेच फिरण्यासाठी जाण्याचे अनेक जण स्वप्न पाहत असतात. परंतु पैसे आणि वेळ या कारणांमूळे अनेकांचे हे स्वप्न हे स्वप्नच राहते. परंतू हे स्वप्न आपल्या देशात देखील आपण पूर्ण करू शकतात. भारतात बर्‍याच जागा आहेत ज्या परदेशी देशांशी अगदी जुळतात. या ठिकाणी परवडण्याजोग्या सहली आपल्याला परदेशात राहण्यासारखेच वाटते. तर चला जाणून घेवू अशा ठिकाणांची माहिती.

गुलमर्ग

जम्मू- काश्मीरमधील गुलमर्गला भारताचे स्वित्झर्लंड म्हणतले जाते. येथे हनीमूनला भेट देणार्‍या जोडप्यांची संख्या मोठी असते. हे स्थान खूप लोकप्रिय असून हा परिसर संपूर्ण बर्फाने झाकलेले असल्याने स्वित्झर्लंडचा फिल येथो प्रत्येकाला येतो.

श्रीनगर

श्रीनगर येथील फुलांची बाग ही अ‍ॅमस्टरडॅम सुंदर बागेची आठवण करू देते. येथे विविध फुलांचे प्रकार, शांत वातावरण, मंत्रमुग्ध करणारे दृश्य आपल्याला आठवण करून देईल.

अंदमान निकोबार

अंदमान आणि निकोबार ही पर्यटन स्थळ एक सुंदर ठिकाण असून येथे सुंदर समुद्र किनारे आहे. हे ठिकाण थायलंडच्या फाय-फाय बेटा प्रमाणे दिसून येते. येथे स्कूबा डायव्हिंग, सर्फिंग, नौकाविहार आणि स्नॉर्किंग यासारख्या साहसी अनुभव तुम्ही घेवू शकतात.

केरळ

केरळ राज्य हे निर्सग संपन्न असून येथील अलाप्पुझा शहर इटलीमधील वेनिसची शहराची आठवण करून देणारी आहे. हिरव्या कडा आणि बदकांचा कळप आपल्याला पाण्यावर पोहून व्हेनिस येथे घेऊन जाईल.

छत्तीसगड

छत्तीसगड राज्यात चित्रकूट धबधबा पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. परंतू हा धबधबा कॅनडाच्या नायगरा धबधब्याची आठवण करू देतो. या धबधब्याची उंची सुमारे 95 फूट आहे आणि हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. जुलै ते ऑक्टोबर हा येथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे.

कर्नाटक

भारताच्या पश्चिम घाटात म्हणजेच कर्नाटक परिसरातील टेकड्या स्कॉटलंडच्या पर्वतांची आठवण करून देतात. असे म्हटले जाते की कर्नाटकच्या कुर्गचे दृश्य स्कॉटलंडसारखेच आहे. जर आपल्याला पाऊस आवडत असेल येथे नक्की जा. ऑक्टोबर ते मे दरम्यान येथे सर्वाधिक पर्यटक भेट देतात.

पुडुचेरी

पुडुचेरीचे सौंदर्य आणि प्रसन्न वातावरण पूर्णपणे फ्रेंच शहरासारखे अनुभव देते. पोर्तुगाल, फ्रेंच आणि डच शैलीत बनवलेल्या वसाहती अजूजूनही येथे दिसतील.

कसोल

कसोलला मिनी इस्त्राईल म्हटले जाते. येथे आपल्याला मोठ्या संख्येने इस्त्रायली लोकसंख्या आढळेल. या व्यतिरिक्त आपण हिब्रू चिन्ह आणि हॅम नावाच्या डिशचा स्वाद घेऊ शकता. इथं आल्यानंतर इस्त्राईल आणि कसोल यांच्यातील फरक सांगणं खूप अवघड झालं आहे.

सिक्कीम

सिक्कीमचा गुरुडॉंगमार तलाव जगातील 15 मोठ्या तलावांपैकी एक आहे. या लेकचे दृश्य आइसलँडमधील जोकुसरलॉनझिलसारखेच आहे. सिक्कीमच्या या सरोवराचे दृश्य केवळ सुंदरच नाही तर त्यामध्ये पाण्याचे औषधी गुण देखील आहेत.

थार वाळवंट

आफ्रिकेचा विशाल सहारा वाळवंट राजस्थानच्या थार वाळवंटांसारखा वाटत आहे. उंट चालविण्यापासून ते रात्रीच्या शिबिरापर्यंत पर्यटकना येथे एक विशेष अनुभव द्या. हे भारतातील अशा प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे जेथे परदेशी सर्वात जास्त पसंत करतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT