जळगावः भारतातील एतिहासिक (Historical) शहरांमध्ये कच्छ हे महत्वाचे मानले जात असून येथे इतिहासानुसार हडप्पा, सिंधू संस्कुतीचे (Harappan, Sindhu culture) पाहण्यास मिळते. त्यामुळे येथे फिरण्याबरोबरच अनेक ऐतिहासिक स्थळेही उपस्थित आहेत. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर एकदा नक्की कच्छला (Kutch) भेट द्या, चला जाणू घेवू अशा ठिकाणांबद्दल..
विजय विलास पॅलेस
कच्छ व गुजरात राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर राजवाड्यापैकी विजय विलास पॅलेस एक आहे. युवराज श्री विजय राज यांच्या नावाने हा महाल बांधण्यात आला. विजय विलास पॅलेस लाल वाळूच्या दगडाने बनलेला आहे, उत्कृष्ट कोरीवकाम येथे पाहण्यास मिळतात. तसेच महालावर भारतातील विविध भागांतील कारागीरांचे सौंदर्यासह दर्शनही पाहण्यास मिळतो. 45 एकर जागेत पसरलेल्या हा महाल पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण आहे.
कच्छ संग्रहालय
प्राचीन कलाकृती आणि आदिवासी लोकांच्या संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन कच्छ स्कूल ऑफ आर्ट्स म्हणून स्थापन झालेले हे संग्रहालयालयात आपणास कच्छ मध्ये मिळते. येथे तुम्हाला अनेक इतिहासातील गोष्टी पाहायला मिळतील. तसेच विज्ञान, संस्कृती, इतिहास इत्यादीबद्दल बर्याच गोष्टी शिकाल. जर तुम्हाला इतिहासामध्ये रस असेल तर तुम्ही इथे अवश्य भेट द्या.
रोहा किल्ला
रोहा किल्ला जवळपास 550 वर्षांनंतरही अबाधित आहे. दगड आणि भाजलेल्या विटांनी बांधलेला हा किल्ला एखाद्या मंदिरासारखा दिसतो. शांतता प्रस्थापित करण्यासाठी कलापींनी त्यांच्या कविता रचल्या. तुम्हाला इथले शांत वातावरण आवडेल. याशिवाय येथे तुम्हाला मोर पाहण्यास मिळेल.
ढोलविरा
सिंधू संस्कृतीच्या मुख्य शहरांपैकी एक ढोलविरा हे शहर आहे. मसर आणि मनहर या दोन नद्यांच्या मध्यभागी ढोलविरा हे वसले होते. इतिहास नमुद असून ढोलविरा हे मुख्य बंदर क्षेत्र होते. हे देश परदेशात व्यापाराचे माध्यम होते, येथील मणी मेसोपोटेमियामध्येही सापडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.