Monsoon Tourism esakal
टूरिझम

Monsoon Tourism : नागमोळी वळणांची निसर्गरम्य वाट अन् 'या' ठिकाणाहून दिसते सुंदर सोनेरी पहाट

यंदा मान्सूनमध्ये तुम्हालाही अशा ठिकाणी जायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच

साक्षी राऊत

Monsoon Special Spots : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जो फिरायला जातो तो निसर्गाच्या प्रेमात रमून जातो. मान्सूनमध्ये विकेंड येताच लोक फिरायला बाहेर पडतात. गार वारा, निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतात. यंदा मान्सूनमध्ये तुम्हालाही अशा ठिकाणी जायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच. जाणून घ्या सविस्तर.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील महाबळेश्वरपाठोपाठ बाराही महिने थंड हवेसाठी 'आंबा गिरिस्थान' प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 750 मीटर उंचीवर असलेले हे पर्यटनस्थळ घाटमाथ्यावरचे उटी म्हणूनही ओळखले जाते. धकाधकीच्या रहाटगाडग्यातून वर्षातील बाराही महिने कोणत्याही ऋतूत कुटुंबासमवेत एन्जॉय करण्यासाठी येथे जाता येते.

हिरवाकंच निसर्गसाैंदर्य इथे पहायला मिळते. सह्याद्रीच्या घाटातील हजारो फूट खोल दऱ्या, दाट धुक्‍यात हरवलेला घाट, कातीव कडे, घनदाट जंगल, नागमोडी वळणे याने, मन रमून जाते. उन्हाळ्यात सुखद गारवा देणारा वारा, पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊस, डोंगरमाथ्यांतून फुटणारे धबधबे याबराेबरच जंगली श्वापदांचे दर्शनही पर्यटकांना हाेते.

औषधी वनस्पतींचा अनमोल खजिना व विलोभनीय जलाशय दिसताे. पक्ष्यांचा गुंजारव, रानमेवा, जंगल सफारी व अस्सल गावरान जेवण असा मस्त आणि भन्नाट अनुभव येथे घेता येतो. कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासाचा मध्यबिंदू असलेल्या आंबा गिरिस्थानात दूरवरून येणाऱ्या पर्यटकांची बारमाही गर्दी असते.

Monsoon Tourism

सह्याद्रीच्या पर्वतरांगातील कातीव कडे आणि घाटातील हजारों फूट खोल दऱ्याचे दृश्‍य अंगावर शहारे आणते. निसर्ग सौंदर्याने नटलेला वेडावाकडा घाट पर्यटकांना कायम भुरळ घालतो. येथे गव्यांसाठी राखीव जंगल क्षेत्र आहे. अंबेश्वर देवराई, कोकण पॉइंट, वाघझरा, सडा, निसर्ग माहिती केंद्र, सनसेट पॉइंट, विसावा पॉइंट, नाल्याच्या आकाराचे चक्रीवळण, गायमुख, मानोली जलाशयातील बोटिंग, सासनकडा ही ठिकाणे मनाला मोहवून टाकतात. किल्ले विशाळगडाकडे जाणारा आंबा ते केंबुर्णेवाडी हा सोळा किलोमीटरचा दाट जंगलातील प्रवास पर्यटकांना आकर्षित करतो.

अतिशय सुंदर घाट असल्याने घाटात वाहने चालविताना विशेषतः पावसाळ्यात काळजी घ्यावी आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. घाटात खोल दऱ्या असल्यामुळे सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. धबधब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी करू नये. निसरडी वाट किंवा आडवळणाचा मार्ग टाळावा. निसर्ग ठिकाणांचे विद्रुपीकरण करू नये. (Tourism)

जून ते ऑक्टाेबर या कालावधीत पावसाळा असल्यामुळे चोहोबाजूंनी हिरवा शालू पांघरलेले हिरवेगार निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवून ठेवता येते. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली चिंब भिजता येते. काजव्याची अनोखी दुनिया अनुभवावयास येते. एप्रिल ते जून या कडक उन्हाळ्याच्या कालावधीत येथे पर्यटकांना गारवा मिळतो. रानमेवा चाखावयाला मिळतो. (Monsoon Tourism)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT