Monsoon Tourism Waterfalls esakal
टूरिझम

Monsoon Tourism: ''धबधब्यांवर मद्यपान, अश्‍लील नृत्य, दारुच्या बाटल्या फोडणं रोखा आणि हुल्लडबाजांवर कारवाई करा''

Monsoon Tourism Waterfalls: वनमंत्र्यांनी पाण्याचा जोर कमी होईपर्यंत तात्पुरती धबधब्यांवर बंदी घातली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गोवा राज्याच्या पश्चिम भागातील अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, दुरूनच या धबधब्यांच्या सौंदर्याचा आनंद लुटणे हितकारक ठरणार आहे.

खानापूर : गेल्या रविवारी मुसळधार पाऊस पडत असताना पाली-सत्तरी (गोवा) येथील धबधब्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यांतून शेकडो लोकांनी पावसाळी पर्यटनासाठी (Monsoon Tourism) प्रचंड गर्दी केली. मात्र, धबधब्याच्या (Waterfalls) वाटेवरील एका नदीचे पाणी अचानक वाढल्याने शेकडो तरुण-तरुणी तेथेच अडकले होते. अखेर त्यांना सुखरूप सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या प्रकारची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.

या थरारक घटनेनंतर वनमंत्र्यांनी पाण्याचा जोर कमी होईपर्यंत तात्पुरती धबधब्यांवर बंदी घातली आहे. आठ दिवसांनंतर ते पुढील कृती ठरवणार आहेत. मात्र, कोणतीही तकलादू तरतूद करण्याऐवजी सरकारने धबधब्यांवरील मद्यपान, अश्‍लील नृत्य, सार्वजनिक ठिकाणी मद्याच्या बाटल्या फोडणे, कचरा उघड्यावर फेकणे यासारखी हुल्लडबाजी रोखून ही निसर्गस्थळे अबाधित राखावीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अशा जंगली भागात जाऊन स्वत:च्या जीवाशी खेळण्याचे कारण तरी काय, असा सवाल सत्तरीतील जागरूक लोक उपस्थित करत आहेत. म्हणूनच आता सरकारने धोकादायक धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास लोकांना पूर्णत: बंदी घातली पाहिजे. राज्यातील सर्व धबधबे हुल्लडबाजांपासून दूर ठेवण्यासाठी सरकारने कठोर कार्यवाही केली पाहिजे. तरच अशा घटना पुन्हा होणार नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दुरून ‘जलप्रपात’ साजरे

गोवा राज्याच्या पश्चिम भागातील अनेक धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, दुरूनच या धबधब्यांच्या सौंदर्याचा आनंद लुटणे हितकारक ठरणार आहे. सत्तरीत चोर्ला परिसरात बाराजणांचा धबधबा, देवसाचा धबधबा, म्हातारीचा धबधबा, सुर्लचा घबधबा, चोर्ला घाटातील लाडकीचा धबधबा, सडा येथील बागमती धबधबा डोळ्यांचे पारणे फेडतो. सुर्ल-सत्तरीचा धबधबा म्हणजे विहंगम दृश्याचा अप्रतिम नमुना. सुर्ल सत्तरीत वसलेल्या गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हा नजारा डोंगरमाथ्यावरून न्याहाळता येतो.

धबधब्यांव्यतिरिक्त हेही पहा!

घनदाट जंगले, गड-किल्ले, स्थापत्य कलेचा अप्रतिम आविष्कार असलेली कदंबकालीन मंदिरे, राजवाडे-लाकडी घरे, कोकण आणि गोमंतकीय पध्दतीचे राहणीमान, रुचकर खाद्यपदार्थ, मराठी आणि कोकणी भाषेचा सुंदर मिलाफ असलेली बोली भाषा, समृध्द वनजीवन पर्यटकांनी अनुभवावे, असे ग्रामीण भागातील जनतेला वाटते.

निसर्ग कोंदणातील हिरा : सुर्ल

सुर्ल गावापासून डोंगरमाथ्यावर दगडांचा सपाट सडा आहे. प्रचंड झाडीतून येणारे पांढरे शुभ्र धुके अशा रम्य परिसरात कर्नाटकातून पाण्याचा प्रवाह गोव्याच्या हद्दीतील खोल दरीत झेपावताना दिसतो. या धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड दरी आणि ताशीव कडा आहे. त्याच्या पूर्वेस मधोमध खोल दरी आहे. बाजूला आकाशाला स्पर्श करण्याची स्पर्धा करणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा, नैसर्गिक ताशीव कडे, असे मनमोहक दृश्य पाहावयास मिळते. मात्र, हे दृश्य पाहण्यासाठी धुके ओसरेपर्यंत उत्कटतेने वाट पाहावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT