Monsoon Travel Guide  esakal
टूरिझम

Monsoon Travel Guide : बॅग भरो और निकल पडो! पावसाळ्यातील Holidays स्पेशल बनवतील ही ठिकाणे!

पाऊस, चहा, मित्र आणि बरंच काही...

Pooja Karande-Kadam

Monsoon Travel Guide : पावसाने जरा उसंत घेतलीय. त्यामुळे ओलाचिंब झालेल्या निसर्गानेही नव्याने हिरवाई पांघरलीय. पडझड झालेल्या वाड्यावरील भिंतीवरही हिरवेगार गवताची चादर पसरलीय. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांची पानेही अधिक गडद झालीयेत. एकूणच प्रफुल्लीत करणारे वातावारण आहे. अशा वातावरणात फिरायला जाण्याची मजाच काही और असते.

जर तुम्हाला पावसाळ्यात प्रवास करायला खूप आवडत असेल. या ऋतूत तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. (Monsoon)

जिथे तुम्हाला सर्वोत्तम हँगआउट डेस्टिनेशनचे सुंदर नजारे पाहून परत येण्यासारखं नक्कीच वाटणार नाही. चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात भेट देण्यासारखी 5 ​​ठिकाणे. (Monsoon Travel Guide : august month travel destinations Best places for travel in india month of August)

केरळ

पर्यटकांच्या सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक म्हणजे केरळचे मुन्नार हिल स्टेशन. ऑगस्ट महिन्यात भेट देण्यासारखे हे एक अद्भुत ठिकाण आहे. येथे तुम्हाला धबधबे, वाहणाऱ्या नद्या, वन्यजीव अभयारण्ये आणि धुक्याने झाकलेले सुंदर पर्वत दिसतील.

मुन्नारमध्ये ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी काही उत्तम चहाच्या बागा आणि पायवाटा देखील समाविष्ट आहेत. तुम्ही इथल्या कार्मेलागिरी एलिफंट पार्कमध्ये हत्ती सफारीचा आनंद घेऊ शकता आणि Back Water ला बोटिंगचा आनंदही घेऊ शकता. (Monsoon Tourism)

जोग फॉल्स

कर्नाटकातील जोग फॉल्स हा देशातील सर्वात उंच धबधबा आहे. येथे सुमारे 829 फूट उंचीवरून पाणी खाली येते. येथे तुम्ही डोंगरांच्या मधोमध बसून या सुंदर धबधब्याचा आनंद घेऊ शकता. विशेष म्हणजे या धबधब्याचा आवाज अनेक किलोमीटर अगोदर ऐकू येतो. (Waterfalls)

पावसाळ्यात मुन्नारमध्ये असं धुकं दाटलेलं असतं

शिलाँग

शिलॉंग हे ईशान्येकडील शहर आहे जे पावसाळ्यात हँगआउटसाठी ठिकाणे आहे. जर तुम्हाला पाऊस आणि ढगांचा लपंडाव आवडत असेल तर हे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. त्यामुळे तुम्ही हे देखील तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता.

मध्य प्रदेश - ओरछा

ओरछा हे मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे. जिथे Evening खूप सुंदर असते. तुम्हीही या ठिकाणी भेट देऊ शकता. येथे तुम्ही जहांगीर महल, राज महल आणि रामराजा मंदिर पाहू शकता. रामराजा मंदिराची कथा अशी आहे की हे एकमेव मंदिर आहे जिथे रामाची राजा म्हणून पूजा केली जाते. येथे 400 वर्षांपूर्वी रामाचा राज्याभिषेक झाला होता.

ओरछा हे मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यात वसलेले एक ऐतिहासिक शहर आहे

गोवा

कंटाळलेल्या लोकांना रिफ्रेश करण्यासाठी गोव्याचे बीच हे एनर्जी प्लेस आहेत. येथे तुम्हाला निसर्ग, पार्टी, खाद्यपदार्थ आणि वॉटर स्पोर्ट्स अनुभवायला मिळतील. गोव्यात मजा करण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत आहे. गोव्याचे निसर्गसौंदर्य पाहून तिथला पाऊस एकदा तरी अनुभवावा असंच वाटत असतं.

पावसाळ्यात तुम्ही गोव्यालाही भेट देऊ शकता. येथे सुंदर समुद्रकिनारा आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्याचा आनंद घेता येतो. येथे तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर काही निवांत वेळ घालवू शकता. इथे तुम्हाला खूप शांतता मिळेल. हे ठिकाण जोडप्यांसाठी सर्वोत्तम आहे.


गोव्याचे निसर्गसौंदर्य पाहून तिथला पाऊस एकदा तरी अनुभवावा असंच वाटत असतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT