Nag Panchami 2024  esakal
टूरिझम

Nag Panchami 2024 : भारतात या ठिकाणी आहे नागलोकाचे प्रवेशद्वार, रहस्यमयी ठिकाणी आजही आहे हजारो सापांचे अस्तित्व

Nag Lok Entrance Spots In India : तुम्ही नाग लोकांबद्दल ऐकले असेल. नागलोक हे असे ठिकाण आहे जिथे सर्वत्र नाग मोठ्या प्रमाणावर असतात.

सकाळ डिजिटल टीम

Nag Lok Entrance Spots  :  

श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून लवकरच सणांना सुद्धा आरंभ होईल. उद्या नागपंचमी हा सण असून सर्वत्र नागदेवतेचे पूजा केली जाते. नाग पहिल्यापासून आपले मित्रच आहेत. ते शेतकऱ्यांना मदत करतात पण त्यांना कोणी डिवचलं तर मात्र ती जीव घेतल्याशिवाय राहत नाहीत.

नागांशी संबंधित अनेक कथाही प्रचलित आहेत. त्यापैकी तुम्ही नाग लोकांबद्दल ऐकले असेल. नागलोक हे असे ठिकाण आहे जिथे सर्वत्र नाग मोठ्या प्रमाणावर असतात. हे त्यांचे जग आहे. या नागलोकाच्या अनेक गोष्टीही प्रसिद्ध आहेत.   

भारतात अशी काही ठिकाण आहेत ज्याला नाग लोकाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी जाणं जीव धोक्यात घालण्यासारखाच मानलं जातं. छत्तीसगड झारखंड काशी मध्य प्रदेशात अशी काही ठिकाणी आहेत ज्याला नाग लोकाचा रस्ता म्हणून ओळखलं जातं. आज आपण याच काही ठिकाणांचे माहिती घेऊया. (Nag Panchami 2024 )

काशीतील रहस्यमयी विहीर

काशी हे भगवान शंकरांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणावरती एक अशी विहीर आहे ज्या विहिरीचा थेट नागांच्या जगाशी संबंध आहे. तसेच इथे जाण्यास वर्षभर बंदी असते. वर्षातील केवळ एकच दिवस हे ठिकाण उघडलेले असते.

काशीच्या नवापूर क्षेत्रात एक विहीर आहे. विहिरीला नाग लोकांचे प्रवेशद्वार म्हटले जाते. काशी मधील नवापूरा या क्षेत्रात ही विहीर आहे. वर्षभरातील केवळ एकाच दिवशी या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मिळते. या विहिरीचे दर्शन घेतल्याने सर्पदंश, कालसर्प दोष मुक्ती मिळते.

विहिरीचे खोली किती आहे याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे भारतातील हे एक रहस्यमय ठिकाण आहे असं मानले जाते.

छत्तीसगडमधील तो डोंगर

छत्तीसगडमधील जशपूर क्षेत्र हे असे ठिकाण आहे, ज्याला नाग लोकाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सापांच्या अनेक प्रजाती सापडतात. त्यामुळेच या ठिकाणाला असे नागलोकाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, इथल्या डोंगरदऱ्यांमध्ये असलेल्या एका गुहेला पाताळ लोक असे म्हटले जाते. या गुहेत जे लोक गेले आहेत ते परतले नाहीत. त्यामुळे, मोठ्या दगडाने बंद करण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील तपकारा क्षेत्रात भगवान शंकरांचे एक मंदिर आहे. असं सांगितलं जातं की, या मंदिरात रावणाची बहिण शुर्पनखा पूजा करायची. वनवासात असताना प्रभू श्रीराम आणि माता सीतेने इथे भगवंत शंकरांचे दर्शन घेतले होते.

सातपुडा पर्वत रांग

मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वत रांगेतील घनदाट जंगलात एक रहस्यमय रस्ता आहे. हा रस्ता नागलोकाचे प्रवेशद्वार आहे असे मानले जाते. या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. हे ठिकाण वर्षभर बंद असतं आणि वर्षातून दोन दिवस इथे पर्यटकांना सोडून जाता येतं. या घनदाट जंगलात असलेल्या प्रवेशद्वाराचे दर्शन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मान्यता आहे.

सातपुडा पर्वत रांगेत नागद्वारी म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. या रस्त्यांवरती नागमणीचे मंदिर आहे. या ठिकाणाची सुरक्षा खुर्द नागदेवता करत असल्याने येथे जाण्याचे धाडस कोणी करत नाही. पण तिथे गेलेल्या कुठल्याही भक्ताला साप चावत नाहीत किंवा त्याला त्रास देत नाहीत. जर तुम्ही शुद्ध भावनेने मंदिरात जाऊन प्रार्थना केली तर तुम्ही सुखरूप परतही येऊ शकतात.

झारखंड मधील गुहा

झारखंडची राजधानी रांचीमध्ये डोंगराळ भागात एक मंदिर आहे. या मंदिरात नागदेवांच्या गुहेचे दर्शन घेता येतात. पाचशे वर्षांपूर्वी सापडलेल्या या गुहेत आजही नाग नागिन स्वतः दर्शन देतात. या गुहेच्या आवारात अनेक सापांचे दर्शन तुम्हाला होईल.

आपला पुराणांमध्ये उल्लेख केला आहे की, नाग त्यांच्या जगात म्हणजे नाग लोकात परतण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT