Long Weekend Trip : आज राष्ट्रीय पर्यटन दिवस आहे. सोबतच उद्यापासून लॉंग वीकेंड सुरू होतोय. २६ जानेवारीला हॉलीडे तर २७ ला एका दिवसाची सुट्टी घेतली तर २८ आणि २९ ला शनिवार येत असल्याने २६ ते २९ पर्यंत हा लॉंग वीकेंड होणार आहे.
त्यामुळे या लॉंग वीकेंडला कुठे फिरायला जायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असावा, पण आम्ही तुम्हाला काही बेस्ट ऑप्शन्स सांगणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा वीकेंड घालवू शकता. चला तर जाणून घेऊया. (National Tourism Day Long Weekend Trip places read best options )
गोवा : गोवा हा फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. गोव्यातील समुद्रकिनारा, अगुआडा किल्ला, काबो फोर्ट आणि मंगेशी मंदिर यासारख्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
कूर्ग : भारताचे स्कॉटलंड तर कधी कर्नाटकचे काश्मीर म्हणून प्रसिद्ध असणारे कूर्ग या सुंदर हिल स्टेशनला एकदातरी प्रत्येकाने भेट द्यावी. कारण येथील दृश्ये इतकी सुंदर माणसाचं मन तृप्त करतात.
उटी : तामिळनाडूतील ऊटी हे पर्यटकांचं अतिशय आवडतं ठिकाण आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी असो की कुटूंबासोबत ट्रिप करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. समुद्र सपाटीपासून 2,240 मीटर उंचीवर असलेलं हे हॉलीडे डेस्टिनेशन उत्तम ठिकाण आहे.
हंपी : विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हंपी हे शहर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी ह्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले गेले होते.
येथील इथले विरुपाक्ष मंदिर जगप्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली १००० मंदिरे व स्मारके आहेत.
कोकण : मुंबई ते गोव्यापर्यंत पसरलेला कोकण प्रदेश लॉंग वीकेंडच्या ट्रिपसाठी उत्तम आहे. येथे तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरील हिरवेगार सौंदर्य अनुभवू शकता.
या शिवाय गणपतीपुळे,अलिबाग, रत्नागिरी, मुरुडचा जंजिरा किल्ला, सर्वात आकर्षक स्थळांपैकी एक म्हणजे महाड शहर आणि बदलापूर येथील रिव्हेटिंग धबधबे अगदी मोहक करणारे आहेत.
अजंता वेरूळ लेणी : औरंगाबाद शहरापासून सुमारे ११० किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या शेजारी डोंगरात कोरलेली अजिंठा लेणी हे उत्तम कलेचं उदाहरण आहे
औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ येथे प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि पाच जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. जर तुम्हाला काही हटके तुमची ट्रिप करायची असेल तर अजंता वेरूळ लेणीला तुम्ही अवश्य भेट द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.